
पुणे : पुण्यातील भिडे पूल वाहतुकीसाठी पुढचा दीड महिना बंद राहणार आहे. यामुळे भिडे पूल परिसरात वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. पुणे मेट्रोच्या डेक्कन स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचं काम सुरू केलं जाणार आहे. या कामामुळे बाबा भिडे पूल सोमवार २० एप्रिलपासून दीड महिन्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.