Pune: दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका, कात्रज तलावात कचऱ्याचे साम्राज्य

पेशवेकालीन तलावाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
Pune Bad smell threatens health of citizens garbage Katraj lake
Pune Bad smell threatens health of citizens garbage Katraj lakeSakal

कात्रज - नानासाहेब पेशवे तलावात ड्रेनेजच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून तलावाच्या पाण्यावर कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. तलावाची कुठल्याही प्रकारची काळजी घेण्यात येत नाही.

पाण्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या, निर्माल्य पाण्यावर तरंगत असल्याचे चित्र दिसून येते. दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

Pune Bad smell threatens health of citizens garbage Katraj lake
Mumbai Crime : 23 वर्षीय हवाई सुंदरीच्या हत्या प्रकरणाचा उलगडा; आरोपी सफाई कर्मचारी...

यामुळे जलचरांनाही धोका निर्माण झाला आहे. मच्छर आणि डासांचा उपद्रव वाढला असून पाण्याचा उग्र वास येत आहे.

आजूबाजंच्या सोसायट्यांतील नागरिकांचे आणि तलाव परिसरात चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सातत्याने अशाप्रकारे तलावात कचरा साचल्याचे आणि दुर्गंधी सुटल्याचे निदर्शनास येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत असतात.

Pune Bad smell threatens health of citizens garbage Katraj lake
Pune Job : पोलिस पाटील होऊ इच्छिणाऱ्यांनो लागा तयारीला

हा तलाव पेशवेकालीन असून तलावातून पेशव्यांनी पुण्याला पाणी उपलब्ध केले होते. नानासाहेब पेशवे यांनी वर्ष १७४९ मध्ये कात्रज परिसरात २ तलाव बांधले आणि शहरभर पाणी फिरवले.

त्यावेळी कात्रज ते शनिवारवाड्यापर्यंत भुयारी मार्गाने पाणी नेण्यात आले होते. म्हणून तलावाला नानासाहेब पेशवे तलाव असे नाव ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. इंग्रजांनीही ही वितरण व्यवस्था १९२० पर्यंत कायम ठेवली. तलावातील गाळ काढून शहराला पाणीपुरवठा केला जात असे.

Pune Bad smell threatens health of citizens garbage Katraj lake
Mumbai News : बचपन मनाओ, बढ़ते जाओ; बालपण साजरे करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी उपक्रम

प्रतिक्रिया

कात्रजचा तलाव अत्यंत भीषण अवस्थेत आहे, कचरा तलावात तरंगताना दिसतो. स्वातंत्र्य दिवस आणि प्रजासतत्ताक दिनाच्या दिवशीच केवळ तलावाची व्यवस्थित स्वच्छता करण्यात येते.

त्यांनतर स्थानिक प्रशासन याकडे गंभीरतेने पाहत नाही. प्रशासनाने कायम तलाव स्वच्छ ठेऊन नागरिकांना दिलासा द्यावा ही आमची मागणी आहे.

- आशिष भोसले, स्थानिक नागरिक

तलावाची आठवड्यातून दोन-तीन वेळा सफाई करण्यात येते. मात्र, श्रावण महिना असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर निर्माल्य टाकतात. त्यामुळे पाण्यावर कचरा साचत आहे. त्याची तत्काळ सफाई करण्यात येईल.

- योगेश ताम्हाणे, उद्यान निरीक्षक, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com