पुणे-बालाजी सायकल प्रवासात प्रदूषण-व्यायामाची जागृती - अभिषेक माने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Abhishek Mane

पुणे-बालाजी (तिरुमला) असा चार राज्य आणि ११ जिल्ह्यातून एक हजार २२२ किमी प्रवास महाविद्यालयीन तरुणाने केला.

Cycle Journey : पुणे-बालाजी सायकल प्रवासात प्रदूषण-व्यायामाची जागृती - अभिषेक माने

उंड्री - पुणे-बालाजी (तिरुमला) असा चार राज्य आणि ११ जिल्ह्यातून एक हजार २२२ किमी प्रवास महाविद्यालयीन तरुणाने केला. व्यायाम आणि प्रदूषण टाळण्यासाठी सायकल कशी महत्त्वाची आहे, ही बाब समाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न अभिषेक माने (रा. उंड्री, ता. हवेली, जि. पुणे. मूळ- भोलावडे, ता. भोर, जि. पुणे) याने केला आहे.

अभिषेक श्री शिवाजी मराठा सोसायटी लॉ कॉलेजमध्ये एलएलबीच्या प्रथम वर्षामध्ये आहे. वाढते प्रदूषण टाळण्यासाठी सायकल वापरा हा संदेश देत चक्क (महाराष्ट्र- पुणे, सोलापूर, उस्मानाबाद), (कर्नाटक-बंदार), (तेलंगणा- मेडक, रंगारेड्डी, हैदराबाद, महबुबनगर), (आंध्रा प्रदेश- नंदयाल, वाय.येस.आर. चित्तूर) अशा चार राज्य आणि ११ जिल्ह्यातून एक हजार २२२ किमी सलग सहा दिवस सायकल प्रवास केला. अभिषेकचा १ जानेवारी, २०२३ रोजी सुरू झालेल्या प्रवासाची सांगता ६ जानेवारी, २०२३ रोजी बालाजी (तिरुपती, आंध्र प्रदेश) येथे झाली.

सोलापूर, उमरगा, हैदराबाद, श्रीसैलम व तिरुपती या ठिकाणी मुक्काम केला, त्यावेळी तेथे सायकल वापरा प्रदूषण टाळा, असे प्रबोधन केले. त्याला तेथील नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. हा प्रवास सांघिक नव्हे, तर एकट्याने केला ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.

अभिषेक म्हणाला की, पुणे-बालाजी हा एक हजार २२२ किमीचा पहिलाच मोठा प्रवास करण्याचा निश्चय केला होता. तो यशस्वी करता आला आणि आता जगातील सर्वात मोठी तौर दे फ्रान्स ही स्पर्धा असते, त्या स्पर्धेमध्ये भारतीय टीमला घेऊन जायचा निर्धार केला आहे. माझे वडिल आणि चुलते रोलमॉडेल आहेत. आईकडून सतत प्रोत्साहन मिळत असते, असे त्याने सांगितले.