esakal | Pune : बँड पथकांचा सूर हरपला
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : बँड पथकांचा सूर हरपला

sakal_logo
By
महेश जगताप

स्वारगेट : गणेशोत्सव जवळ आला की, ब्रास बँडपथक, वाद्य निर्मिती व्यावसायिक यांचा तेजीचा काळ. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची बँड बुक करण्यासाठी, नवीन ढोल ताशे घेण्यासाठी एकच पळापळ असायची. बँड पथक व्यावसायिकही आपल्या कलाकार मंडळींना अनामत रक्कम देऊन ‘आपल्याच बँड पथकात हा राहील’ यासाठी धडपड असायची, पण आत्ता मात्र गणेशोत्सव सुरू झाला तरी बँडपथक, वाद्य निर्मिती व्यावसायिक मागणी नसल्याने प्रचंड चिंतेत आहेत. सलग दुसऱ्या वर्षीही त्यांच्या रोजगाराचा घास कोरोनाच्या संकटामुळे हिरावला आहे.

दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या दोन महिन्याआधीच आमच्या बँड पथकाची बुकिंग होऊन जात असे, आज मात्र आम्ही रस्त्यावर आलो आहोत, मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे कोणतेच काम मिळाले नाही, बँड पथकाचे साहित्य, रथ तसेच धूळ खात पडले आहेत, आमच्याकडे काम करणारे कलाकार मंडळी आज अत्यंत हलाकीच्या परिस्थितीमधून जात आहेत. ही माणसे कामासाठी वणवण फिरत आहेत, अशी व्यथा बँडपथक व्यावसायिकांनी ‘सकाळ’शी बोलताना मांडली आहे.

मागील दोन वर्षांपासून गणेशोत्सव व इतर कोणतेही सण सार्वजनिकरीत्या साजरे न करता आल्यामुळे या व्यवसायाच्या संलग्न व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. हे व्यवसाय पूर्णपणे मोडकळीस आले आहे. यामुळे हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. त्यांच्या मागण्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.

शहरातील सद्यस्थिती

  1. बँड पथकांची संख्या २५० ------ ३००

  2. वाद्यनिर्मिती, दुरुस्ती व्यावसायिक २५ ------ ३०

  3. व्यवसायावर अवलंबून राहणाऱ्यांची संख्या ------- १० हजारपेक्षा अधिक

loading image
go to top