
पुण्यातील बाणेर आणि विमानतळ भागात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा टाकला. या छाप्यात १८ मुलींची सुटका करण्यात आलीय. यातील १० पेक्षा जास्त मुली या परदेशी नागरिक असल्याचं आढळून आलंय. स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश झाल्यानं पुण्यात खळबळ उडालीय.