

Pune Bar Association annual election voting news
sakal
पुणे : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या (पीबीए) वार्षिक निवडणुकीत सुमारे साडे सात हजार वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत सुमारे १४,५०० वकिलांची नावे होती. मात्र त्यापैकी निम्म्याच वकिलांनी प्रत्यक्ष मतदान केले.
निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदान केंद्रावर वकिलांची मोठी गर्दी झाली होती. मतदानासाठी दीड ते दोन तास रांगेत उभे राहावे लागत होते. दीर्घ प्रतीक्षेमुळे काही वकिलांनी मतदान न करता परत जाणे पसंत केले; तर बहुतांश वकिलांनी वेळ काढून रांगेत उभे राहून मतदान केले.