पुणे : एंजल्स बेस बॉल संघ दिल्लीत ठरला उपविजेता

डॉ. कदम स्पोर्ट ॲकॅडमीतील ११ वर्ष वयोगटातील खेळाडूंच्या पुणे एंजल्स संघाने या स्पर्धेतील उपविजेतेपद पटकावले.
एंजल्स बेस बॉल संघ दिल्लीत ठरला उपविजेता
एंजल्स बेस बॉल संघ दिल्लीत ठरला उपविजेता sakal

इंदापूर : येथील डॉ. कदम स्पोर्ट ॲकॅडमीतील ११ वर्ष वयोगटातील खेळाडूंच्या पुणे एंजल्स संघाने दिल्ली येथे दि. १० ते १२ डिसेंबर २०२१ मध्ये पार पडलेल्या मेजर लीग बेस बॉल कप इंडिया ( एमएलबी कप इंडिया २०२१ ) स्पर्धेमध्ये सलग तीन सामने जिंकून उपविजेतेपद पटकावले.

या संघाचा पहिला सामना पॉंडेचरी संघा बरोबर झाला. हा सामना या संघाने १७ गुणांनी जिंकली. या संघाने दुसरा सामना मणिपुरम संघाबरोबर १७ गुणांनी जिंकला. संघाचा तिसरा सामना अहमदनगर संघाबरोबर होवून तो देखील १७ गुणांनी जिंकून संघाने हॅट्ट्रिक केली. तीन सामने जिंकून संघाने अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. पुणे एंजल्स विरुद्ध सातारा ब्लुजय यांच्यामधील अंतिम सामना रंगतदार होवून पुणे एंजल्स संघाने उपविजेते पद पटकावून सिल्वर मेडल हे पदक पटकावले.

एंजल्स बेस बॉल संघ दिल्लीत ठरला उपविजेता
कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या वारसांना ५० हजारांची मदत

पुणे एंजल्स संघाच्या ओम अडसूळ,अक्षय खाडे,चेतन बनकर,वेदांतराजे साळुंखे, शिवराज शेरकर,आरुष माने,वेदांत सपकळ, वेदांत देवकर,तनया पवार,आस्मी राऊत, प्रगती जगताप, स्वरा गूजर या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.इंदापूरविद्या प्रतिष्ठानच्या ओम अडसूळ या खेळाडूची डॉ. कदम स्पोर्ट ॲकॅडमी मधून संघात निवड झाली होती. या खेळाडूस सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला.या सर्व खेळाडूंन मुळे देशाच्या राजधानीत डॉ.कदम स्पोर्ट ॲकॅडमीचे नाव लहानग्यांनी उज्ज्वल केले.

संघ प्रशिक्षक विष्णू काळेल, वैभव जगताप यांचा मेडल देवून तर पालक प्रतिनिधी ज्ञानेश्वर देवकर,सुनिता देवकर, स्कूल संघ व्यावस्थापक संदीप जगताप यांचा मेजरलीग बेसबॉल कप इंडियाच्या वतीने गौरवकरण्यात आला. उपविजेता संघ, प्रशिक्षक व सर्व प्रतिनिधींचा डॉ.कदम स्पोर्ट ॲकॅडमी अध्यक्ष डॉ. लहू कदम, संचालिका डॉ. सविता कदम, प्राचार्य वृंदा मुलतानी-जोशी, कनिष्ठ विभाग प्राचार्या अनिता पराडकर, उपप्राचार्य रिशी बसू यांनी अभिनंदन केले. संघातील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्कार पटकवणाऱ्याविद्या प्रतिष्ठानच्या ओम अडसूळ याचे इंदापूरइंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्या सौ.ज्योती जगताप यांनी विशेष अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com