esakal | काय सांगता? पुणे ठरले राज्यातील सर्वांत थंड शहर
sakal

बोलून बातमी शोधा

Pune became the coldest city in the state of Maharashtra

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून हवेतील किमान तापमानाचा पारा सातत्याने कमी होत आहे. चाळीस दिवसांमधील सर्वांत नीचांकी किमान तापमान (१०. ७ अंश सेल्सिअस) बुधवारी शहरात नोंदले गेले. त्यानंतर गुरुवारी सकाळपर्यंत किमान तापमानाचा पारा आणखी घसरून १०. ३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला.

काय सांगता? पुणे ठरले राज्यातील सर्वांत थंड शहर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यात पुणे हे सर्वांत थंड शहर असल्याची नोंद गुरुवारी हवामान खात्यात झाली. पुण्यातील शिवाजीनगर येथे किमान तापमानाचा पारा १०. ३ अंश सेल्सिअस नोंदला. पुढील दोन दिवसांमध्ये हवेतील गारठा कायम राहील, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला.

पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून हवेतील किमान तापमानाचा पारा सातत्याने कमी होत आहे. चाळीस दिवसांमधील सर्वांत नीचांकी किमान तापमान (१०. ७ अंश सेल्सिअस) बुधवारी शहरात नोंदले गेले. त्यानंतर गुरुवारी सकाळपर्यंत किमान तापमानाचा पारा आणखी घसरून १०. ३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. पुण्यातील शिवाजीनगर येथे किमान तापमान सरासरीपेक्षा १. ३ अंश सेल्सिअसने घसरले. राज्यातील सर्वांत किमान तापमान पुण्यात नोंदले गेले, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

बारामतीत डझनभर पिस्तुले जप्त; पिस्तुलांचं MP कनेक्शन आलं उजेडात! 

पुण्यात पुढील दोन दिवस हवेतील गारठा कायम राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान १० ते ११ सेल्सिअसपर्यंत राहील. त्यामुळे येत्या शुक्रवारी (ता. ५) सकाळी धुके पडण्याची शक्यता असून, आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तर, शनिवारी (ता. ६) किमान तापमानाचा पारा पुन्हा १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. त्यानंतर आकाश निरभ्र राहणार असल्याने पुढील दोन दिवस हवेतील गारठा आणखी वाढेल, असेही हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.

राज्यात थंड वारे
राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहेत. कोकणातील काही भागांत थंडी कमी असली, तरी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात थंडीत वाढ झाली आहे. पुढील चार ते पाच दिवस ही थंडी कमी-अधिक स्वरूपाची राहील. अफगाणिस्तानचा पूर्व भाग आणि पाकिस्तानच्या उत्तर परिसरात चक्रीय स्थिती आहे. राजस्थानच्या वायव्य व परिसरात चक्रीय स्थिती असल्याने पावसासाठी पोषक वातावरण आहे. यामुळे उत्तर भारतातील काही भागांत अवकाळी पाऊस पडत आहे. तसेच उत्तर केरळची किनारपट्टी ते दक्षिण गुजरात या दरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. यामुळे कोकणातील काही भागातील किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे.


असा करा राष्ट्रीय जेईई मेन्सचा अभ्यास

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे आहे. यामुळे उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह याच दिशेने वाहत असल्याने या भागात चांगलीच थंडी आहे. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. नगर, पुणे, नाशिक भागांत कडाक्याची थंडी आहे. मराठवाड्यात थंडीत बऱ्यापैकी वाढ झाली आहे. परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात सर्वांत कमी १०.२२ अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. विदर्भातही थंडीत चढउतार होत असले तरी गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर भागात थंडी अधिक प्रमाणात आहे.

परीक्षेसाठी कोर्टानं मंजूर केला जामीन; कोंबड्या चोरल्याच्या गैरसमजातून केला होता जीवघेणा हल्ला​

loading image
go to top