Pune : जाहिरात फलकाच्या विजेचा धक्का लागून फुरसुंगीत गाईचा मृत्यु

रात्री दहाच्या सुमारास येथे उगवलेले गवत खाण्यासाठी गाई आली होती
PUNE
PUNESAKAL

फुरसुंगी : एचडीएफसी बँकेच्या एटीएम च्या जाहिरात फलकाचा विजेचा धक्का लागून गाईचा मृत्यू झाल्याने फुरसुंगीमधील नागरिकांकडून हळहळ आणि काळजी व्यक्त होत आहे.पावरहाऊस येथील सोलिटीअर सोसायटीमध्ये एचडीएफसी बँकेची नव्याने शाखा चालू करण्यात आली आहे.

मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास येथे उगवलेले गवत खाण्यासाठी गाई आली होती.मात्र येथे लावलेल्या जाहिरात फलकाचा विदूत पुरवठा खांबामधे उतरल्याने गवत खाण्यासाठी आलेल्या गाईला विजेचा धक्का लागून गाईचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सोसायटीचे अध्यक्ष सुनील काकडे यांनी बँकेच्या व्यवस्थापकाना आणि महावितरण अधिकाऱयांना बोलावून ही बाब निदर्शनास आणून दिली.मात्र येथे सोसायटीतील लहान मुलांची वर्दळ असते.

याठिकाणी आणखी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आशा विदूत फलकांचा प्रशासणाकडून तपासणी होणे गरजेचे आहे.असे येथील रहिवासी संतोष हरपळे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com