पुणे : तरुणाचा खुन केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून तिघांना अटक

गुन्ह्यात अल्पवयीन मुलाचा सहभाग
अटक
अटकsakal media

पुणे : भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी भरदिवसा तरुणावर पिस्तुलातुन गोळ्या झाडून खुन करण्याची घटना घडली. या प्रकरणामध्ये भारती विद्यापीठ पोलिसांनी आठ तासातच गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन अटक केली. या प्रकरणामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही सहभाग आहे. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तुल जप्त केले.

मेहुबब सैफान बलुरगी (वय 33, रा. जनता वसाहत), सुफियान फैय्याज चौरी (वय 19, रा. लक्ष्मीनगर, पर्वती पायथा), निलेश सुनील कुंभार (वय 30, रा. लक्ष्मी कॉलनी, हडपसर) यांच्यासह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. समीर लालबादशाह हुसेन मनुर (वय 32, रा. आंबेगाव) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. समीरने आरोपींकडून पाच लाख रुपये घेतले होते. त्यापैकी अडीच लाख रुपये त्याने परत केले, मात्र उर्वरीत अडीच लाख रुपये त्याने परत केले नाहीत. दरम्यान, समीर सोमवारी दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रभागा हॉटेलसमोर आरोपींनी पिस्तुलातुन गोळ्या झाडून खुन केला.

अटक
ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही निवडणुका होऊ नयेत : नाना पटोले

या घटनेचा भारती विद्यापीठ पोलिसांकडून तपास सुरू होता. दरम्यान, या घटनेतील आरोपी कोरेगाव पार्क परिसरामध्ये लपून बसल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी चौरी व कुंभार यांच्यासह अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातील पिस्तुलही यावेळी जप्त केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय पुराणीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंकुश कर्चे, पोलिस कर्मचारी रवींद्र भोसले,राहुल तांबे, धनाजी धोत्रे यांच्या पथकाने हि कामगिरी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com