Pune Crime : बिटकॉईन देण्याचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक; पाचजणांवर गुन्हा दाखल

बिटकॉईन देण्याचे आमिष दाखवून सुमारे २० लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारासह दोघांना पोलिसांनी अटक केली.
 Crime News
Crime News esakal

पुणे - बिटकॉईन देण्याचे आमिष दाखवून सुमारे २० लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधारासह दोघांना शिवाजीनगर पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दहिवली येथून अटक केली. मुख्य आरोपीच्या ताब्यातून सात मोबाईल, दहा सिमकार्ड आणि आठ डेबिट कार्ड जप्त आणि विविध १८ बॅंकांचे पासबुक जप्त करण्यात आले आहेत.

याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियेश अनिल राव ऊर्फ मुकुल शेट्टी (वय ३४, रा. इंदिरानगर, दहिवली, जि. रायगड), शब्बीर हद्रदीश शेख (वय ४१, रा. निर्मलनगर, मीरा रोड), रंजित जरनैल सिंग (वय ३७, रा. हेमिटेज शंगनिला, मीरा रोड, जि. रायगड), मंगेश कदम (रा. स्नेहसागर सोसायटी, गोखलेनगर) आणि सुजय पॉल (रा. हांडेवाडी रस्ता, पुणे) अशी संशयितांची नावे आहेत. मुख्य सूत्रधार मुकुल याच्यासह शब्बीर शेख या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार पेठेतील फिर्यादीचे शिवाजीनगर येथे कार्यालय आहे. आरोपी मुकुल याच्या टोळीतील दोघे फिर्यादीला भेटले. त्यांनी फिर्यादीला तीन बिटकॉईन देतो, असे सांगून एकाने त्याच्या बँक खात्यावर फिर्यादीकडून १९ लाख ७० हजार रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर बिटकॉईनची मागणी केल्यानंतर आरोपींनी त्यांना बिटकॉईन दिले नाहीत. याउलट बिटकॉईनची मागणी केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी व्यक्तीने गेल्या मार्च महिन्यात तक्रार दिली होती. त्यावरून शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

मुख्य आरोपी हा नाव आणि मोबाईल क्रमांक बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. परंतु शिवाजीनगर पोलिसांनी सायबर पथकाच्या मदतीने तपास करून आरोपीला कर्जत येथून अटक केली. त्याच्या घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांनी सात मोबाईल, १० सिम कार्ड, १८ बॅंकांचे पास बुक, आठ डेबिट कार्ड आढळून आले. आरोपींनी बिटकॉईनचे आमिष दाखवून आणखी कोणाची फसवणूक केली आहे काय, याचा तपास पोलिस करीत आहेत. अशा प्रकारची कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी शिवाजीनगर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com