

Entry of Prithviraj Sutar and Sanjay Bhosale into BJP
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला तसेच कोथरूडमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना जोरदार धक्का दिला. माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्यासह येरवड्यातील माजी नगरसेवक संजय भोसले यांचा आज (ता. २३) शहर कार्यालयात भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशामुळे कोथरूड व येरवड्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.