

BJP Woman Leader From Pune Dies at 60 Party Workers Pay Tribute After Her Sudden Passing and Remember Her Political Work
esakal
-रवींद्र पाटे
नारायणगाव : जुन्नर तालुक्याच्या राजकारणातील आक्रमक नेतृत्व, भाजप नेत्या आशा दत्तात्रय बुचके (वय 60) यांचे उपचार सुरू असताना आज पहाटे मुंबई येथे रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे पती, एक मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजता वैष्णव धाम (ता. जुन्नर) येथील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष नाना खैरे, मंडल अध्यक्ष आशिष माळवदकर यांनी दिली.