esakal | पुणे: ब्लॉसम पब्लिक स्कूल आणि सिग्नेट स्कूल उत्साहात सुरू । School
sakal

बोलून बातमी शोधा

ब्लॉसम पब्लिक स्कूल आणि सिग्नेट स्कूल उत्साहात सुरू

ब्लॉसम पब्लिक स्कूल आणि सिग्नेट स्कूल उत्साहात सुरू

sakal_logo
By
विठ्ठल तांबे

धायरी : सोमवारी नऱ्हे येथील जेएसपीएम व टीएसएसएम संस्थेच्या ब्लॉसम पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज न्यू तसेच सिग्नेट स्कूलमध्ये शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पुन्हा उत्साही आणि आनंदी  वातावरणामध्ये सुरूवात झाली. शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत औक्षन करून करण्यात आले.

हेही वाचा: सातारा: दागिने पॉलिशच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या टोळीस अटक

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जेएसपीएम व टीएसएसएम संस्थेचे विश्वस्त ऋषिराज सावंत आणि प्राचार्या वंदना खरात, प्राचार्या अनिता परबत , सर्व शिक्षक उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्राचार्या खरात आणि प्राचार्या अनिता परबत यांनी विद्यार्थ्यांना करोना काळात घ्यावयाची काळजी, शैक्षणिक वर्षा विषयी मार्गदर्शन केले. वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांचे वर्ग झाले आणि शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. आनंददायी वातावरणामध्ये पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजली. आणि शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळाला.

loading image
go to top