esakal | दागिने पॉलिशच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या टोळीस अटक; बोरगाव पोलिसांची कामगिरी । Crime
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा: दागिने पॉलिशच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या टोळीस अटक

सातारा: दागिने पॉलिशच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या टोळीस अटक

sakal_logo
By
सुनील शेडगे

नागठाणे सातारा : दागिने पॉलिश करून देतो असे सांगून चोरी करणाऱ्या परप्रांतीयांच्या टोळीला पोलिसांनी शिताफीने अटक केली. या प्रकरणी बोरगाव पोलिसांनी चोरलेला मुद्देमाल व दुचाकी जप्त केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या टोळीतील सचिनकुमार योगेंदर साह व रंजित गेंदालाल साह यांना पोलिस कोठडी मिळाली आहे.

हेही वाचा: इंदापूरात पहिल्याच दिवशी २८ हजार विद्यार्थ्यांची हजेरी

टोळीतील अन्य संशयिताना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. 28 सप्टेंबर रोजी रात्रगस्त घालत असताना बोरगाव पोलिसांना अतीत येथील एसटी बसस्थानकाजवळ आठ व्यक्ती संशयितरीत्या फिरत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी चौकशी केली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. या वेळी पोलिसांना त्यांच्याकडे असणाऱ्या बॅगेत दागिने पॉलिश करण्यासाठी वापण्यात येणारी पावडर, ब्रश असे साहित्य आढळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर बोरगाव पोलिस ठाण्यात कारवाई केली.

दरम्यान, बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अतीतसह उंब्रज, कोयनानगर येथे दागिने पॉलिश करून देण्याचा बहाण्याने फसवून दागिने पळविल्याच्या फिर्यादी दाखल झाल्या होत्या. त्या अनुषंगाने बोरगाव पोलिसांनी या टोळीची अधिक चौकशी केली. त्यात टोळीतील सचिकुमार साह व रंजित साह यांनी अतीत येथे गुन्हा केल्याचे कबूल केले.उंब्रज पोलिस ठाण्याच्या हद्दीतही अशाच प्रकारे फसवणूक केल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: तब्बल दीड वर्षानंतर वाजली शाळेची 'घंटा'

पोलिसांनी अतीत येथील गुन्ह्यातील सुमारे वीस हजार रुपये किमतीची दोन सोन्याची कर्णफुले व संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. सचिनकुमार साह व रंजित साह हे सध्या बोरगाव पोलिसांच्या कोठडीत असून उर्वरित संशयित न्यायालयीन कोठडीत आहेत. ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, सहायक पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ, हवालदार प्रवीण शिंदे,धनंजय जाधव,राजू शिखरे, विशाल जाधव व विजय साळुंखे यांच्या पथकाने केली.

loading image
go to top