Pune News : पूर रेषेच्या आत टोलेजंग इमारतीवर पर्यावरणप्रेमीचा आक्षेप; अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

वडगाव बुद्रूक येथे मुठा नदीच्या निळ्या पूर रेषेच्या नदीत भराव टाकून टोलेजंग इमारत उभी केली असून, पाटबंधारे विभागाने याबाबत आक्षेप घेऊनही हे काम केले आहे.
Mutha river blue flood line buildings
Mutha river blue flood line buildingssakal

पुणे - वडगाव बुद्रूक येथे मुठा नदीच्या निळ्या पूर रेषेच्या नदीत भराव टाकून टोलेजंग इमारत उभी केली असून, पाटबंधारे विभागाने याबाबत आक्षेप घेऊनही हे काम केले आहे. त्यामुळे या बांधकामास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांनी केली आहे. यावर महापालिकेने सर्व परवानग्या पाटबंधारेच्या पूर रेषेच्या नकाशानुसारच दिल्या आहेत. त्यामध्ये आमची काही चूक नाही असा खुलासा महापालिकेने केला आहे.

कात्रज-देहू रोड या बाह्यवळण मार्गावर वारजे पुलाजवळ या इमारतीचे काम सुरू आहे. पाटबंधारे विभागाने मार्च २०११ मध्ये मुळामुठा नदीची निळी व लाल पूर रेषांचे नकाशे निश्‍चत केले आहेत. पूर रेषांच्या आराखड्यांना मान्यता देण्याचा अधिकार पाटबंधारे विभागाच्या मुख्य अभियंत्यांपेक्षा कनिष्ठ पदावरील अधिकाऱ्यांना नाही. असे असतानाही पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याने फेब्रुवारी २०१८ परवानगी दिली.

पण ही चूक लक्षात आल्याने पाटबंधारे विभागाने ही परवानगी ग्राह्य धरू नये असे महापालिकेला कळविले होते. तरीही महापालिकेने बांधकामास परवानगी देऊन तेथे निळ्या रेषेच्या आत राडारोडा टाकून टोलेजंग इमारत उभी केली आहे. यामुळे भविष्यात पूर स्थितीला सामोरे जावे लागणार असल्याचा आरोप सारंग यादवडकर यांनी केला.

Mutha river blue flood line buildings
Pune Crime : ट्विटरवरून महिलेला अश्लील कमेंट करणाऱ्यास अटक

महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नियमांचे उल्लंघन करून सर्व परवानग्या दिल्याने शहराला धोका निर्माण केला आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांचे निलंबन करून चौकशी करा अशी मागणी आयुक्तांकडे केली असल्याचे विवेक वेलणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

‘पूर रेषा निश्‍चित करण्याचे अधिकार पाटबंधारे विभागाला आहेत. ही जागा निळ्या पूर रेषेच्या आत नाही, त्यामुळे आम्ही इमारतीसाठी परवानगी दिली आहे. पाटबंधारे विभागाच्या पत्रांमध्ये विसंगती असल्याने संशयाचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे कनिष्ठ अभियंत्यांच्या विरोधात आम्ही तक्रार करणार आहोत.’

- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com