

Pune Book Festival
sakal
पुणे : तब्बल दीड तास शेकडो लहानग्यांचे डोळे त्यांच्या वाटेकडे लागले होते, अखेर तो ‘क्षण’ आला. अवघ्या अंतराळाला गवसणी घालून आलेल्या त्या व्यक्तीचे अखेर आगमन झाले. टाळ्यांचा एकच कडकडाट झाला, विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांची छाती अभिमानाने फुलून आली, सर्वांनी अक्षरशः उभे राहून त्यांचे स्वागत करत त्यांचे रूप डोळ्यांत साठवले.