Pune Book Mahotsav : शांतता.... पुणेकर वाचत आहेत

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (नॅशनल बुक ट्रस्ट) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर दरम्यान पुणे पुस्तक महोत्सवाच्या होत आहे.
Pune Book Mahotsav
Pune Book Mahotsavsakal

पुणे - राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (नॅशनल बुक ट्रस्ट) वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर १६ ते २४ डिसेंबर दरम्यान पुणे पुस्तक महोत्सवाच्या होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने गुरूवारी (ता. १४) दुपारी १२ ते १ दरम्यान ‘शांतता...पुणेकर वाचत आहे’ हे अभिनव अभियायन पार पडत आहे.

ज्याला शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, सामाजिक संस्था, सरकारी आणि खासगी कार्यालये, महापालिकेचे क्षेत्रिय कार्यालये, खासगी आस्थापना अशा सर्वांनी पाठिंबा दिला आहे. यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन पुणे महापालिका, उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षण यांनी एकत्र येत आयोजन केले आहे. उपक्रमाला पुणे बार असोसिएशन, पुणे श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद, खडकी शिक्षण संस्था, रिक्षा पंचायत, भारतीय विचार साधना, ग्राहक पेठ, लायन्स क्लब, डेक्कन एज्युकेशन सोसायटी, मॉडर्न लॉ कॉलेज, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, विमलाबाई गरवारे प्रश्नाला, एच. व्ही.देसाई महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, एटीएसएस कॉलेज ऑफ बिझिनेस स्टडीज अँड कंप्युटर एप्लिकेशन, सह्याद्री शिक्षण मंडळ आर्ट्स , सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, मामासाहेब मोहोळ कॉलेज आदी सुमारे २५० सामाजिक संस्थांनी पाठिंबा दिला आहे.

उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, शिक्षणतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध देशपांडे, सिम्बायोसिस कुलपती डॉ.एस. बी मुजुमदार, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रावत, बार्टीचे महासंचालक डॉ. सुनील वारे, सरहदचे संजय नहार, डॉ. गजानन एकबोटे, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. शिवाजीराव कदम, पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष केतन कोठावळे, पत्रकार अरुण खोरे, साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेता प्रवीण तरडे आदी या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

असे व्हा सहभागी..

उपक्रमात आज गुरुवारी दुपारी १२ ते १ या वेळेत आपल्या आवडीचे पुस्तक वाचायचे आहे. तुम्ही जिथे असाल, तिथे पुस्तक वाचायचे आहे. त्याची माहिती तुम्ही सोशल मीडियावर #mybookstory हा हॅशटॅग वापरून शेअर करता येईल, असे महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com