

Boopodi Land Scam Transferred to Economic Offence Wing (EOW)
Sakal
पुणे : बोपोडी येथील कृषी विभागाच्या जमिनीवर मालकीहक्क दाखवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेला गुन्ह्याचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. तर या प्रकरणातील कुलमुख्त्यारधारक शीतल किसनचंद तेजवानी हिने परदेशात पलायन केल्याची चर्चा आहे. मात्र, तेजवानी पसार झाल्याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अद्याप त्यास दुजोरा दिलेला नाही. या गुन्ह्यातील आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.