Bopodi Dr. Rajendra Prasad School incident : पुण्यातील बोपोडी गावातील डॉ. राजेंद्र प्रसाद मॉडेल स्कूलच्या आवारात गांजाची शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या महिला रखवालदाराने शाळेच्या आवारात गांजाची झाडे लावल्याचा आरोप आहे. पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अमित मुरकुटे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. यानंतर पालकांनीही या महिला रखवालदाराच्या बदलीची मागणी केली आहे.