पुणे : बहिष्कार घातलेल्या कुटुंबाला 20 वर्षांनी मिळाले समाजाचे सभासदत्व 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

पुणे : "आंतरजातीय विवाह केला म्हणून बहिष्कार घातलेल्या जोडप्याचा तब्बल वीस वर्षाने तेलुगू मडेलवार धोबी समाजात सामावेश करून घेण्यात आला. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पुरावा केला होता."

न्यायालयात खटला सुरू असताना तडजोड करून हे प्रकरण मिटवण्यात आले. आणि जोडप्याचा समावेश करून घेण्यास समाजातील पंचांनी होकार दिला. त्यानुसार बुधवारी  सभासदत्वाचा अर्ज भरून पीडित अजित चिंचणे त्यांच्या पत्नीचा समाजात सहभाग करून घेण्यात आला.

अंनिसचे राज्यप्रधान सचिव मिलिंद देशमुख व पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव यांनी सामाजिक बहिष्कार प्रतिबंध कायदा पंचांना समजावून सांगण्याचा प्रयत्नकेला पण त्यांनी दाद दिली नव्हती. २३ सप्टेंबर २०१७ रोजी चिंचणे यांनी खडकी पोलीस स्टेशन मध्ये ९ पंचांविरूध्द गुन्हा नोंदविला. मागील महिन्याभरात पंचांनी फिर्यादीला व सर्व बहिष्कृत कुटुंबांना सभासद करून घेण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे तडजोडी अंती खटला मिटवण्यासाठी आला. तडजोडीतुन मिटलेला हा पहिलाच खटला आहे, असे जाधव यांनी सांगितले.

Web Title: Pune: The boycotted family got membership in community after 20 years