Pune Bridge Repairs : पुण्यातील २१ पुलांची दुरुस्ती आयुर्मान वाढण्यास मदत; दरवर्षी होणार नियमित तपासणी

Structural Audit Identified 98 Bridges Requiring Repairs : स्थापत्य ऑडिटमध्ये ९८ पुलांना दुरुस्तीची गरज आढळल्यानंतर टप्प्याटप्प्याने कामे सुरू असून आता पुलांची दरवर्षी नियमित तपासणी केली जाणार आहे.
Pune Bridge Repairs

Pune Bridge Repairs

esakal

Updated on

पुणे : शहराच्या विविध भागांतील २१ पूल व उड्डाणपुलांच्या दुरुस्तीची कामे महापालिकेने पूर्ण केली आहेत, तर निधीच्या उपलब्धतेनुसार उर्वरित पूल, कल्व्हर्टची कामे टप्प्याटप्प्याने केली जाणार आहेत. त्यापैकी काही पुलांची कामे सध्या सुरू आहेत. दुरुस्तीच्या कामामुळे पुलांचे आयुर्मान वाढण्यास मदत होणार आहे.

शहरातील पूल, उड्डाणपूल, कल्व्हर्टला अनेक वर्षे झाल्याने महापालिकेकडून स्थापत्यविषयक ऑडिट करण्याचे काम तज्ज्ञ सल्लागारांच्या माध्यमातून गेल्यावर्षी करण्यात आले होते. त्यामध्ये ९८ पूल, उड्डाणपुलांची दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यापैकी पाच पुलांच्या दुरुस्तीच्या कामांची जबाबदारी दोष दायित्व कालावधीअंतर्गत (डीएलपी) ठेकेदारांवर असणार आहे. त्यामुळे उर्वरित ९३ पुलांच्या दुरुस्तीची कामे महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाने हाती घेतली होती. त्यानुसार, पुलांच्या दुरुस्तीच्या कामांची अ, ब आणि क अशी वर्गवारी केली होती. अ वर्गामध्ये मोडणाऱ्या पुलांच्या दुरुस्तीला सर्वाधिक प्राधान्य दिले होते.

Pune Bridge Repairs
Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

"पहिल्या टप्प्यात ११ पैकी १०, तर दुसऱ्या टप्प्यात १७ पैकी ११ पुलांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली होती. त्यातील काही पुलांसह तिसऱ्या टप्प्यातील पुलांची कामे सुरू केली आहेत. दुरुस्तीच्या कामामुळे पुलांचे आयुर्मान वाढण्यास मदत होईल."

- दिनकर गोजारे, प्रमुख, विशेष प्रकल्प विभाग, महापालिका

छत्रपती संभाजी महाराज पुलाचे काम लवकरच

रहदारीच्या वेळी वाहतुकीवर परिणाम होणार नाही, याची काळजी घेत महापालिकेने पुलांच्या दुरुस्तीची कामे केली. २१ पुलांच्या दुरुस्तीमध्ये बेअरिंग बदलणे, एक्‍सपांशन जॉईंट रिप्लेसमेंट, स्ट्रेंथनिंग या स्वरूपाची कामे आहेत. तर, छत्रपती संभाजी महाराज पुलाचे काम जलवाहिनीच्या कामामुळे रखडले होते. जलवाहिनीचे काम पूर्ण झाले असून पुलाच्या दुरुस्तीची कामेही लवकरच पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे पहिल्या, दुसऱ्या टप्प्यातील पुलांसह उर्वरित पुलांची तसेच कल्व्हर्टची कामेही महापालिका करणार आहे.

पुलांची होणार वार्षिक तपासणी

महापालिकेने गेल्यावर्षी तज्ज्ञ सल्लागारांमार्फत शहरातील पुलांचे स्थापत्यविषयक ऑडिट केले. त्यानंतर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे. आता प्रत्येक पुलाच्या कामाची दरवर्षी तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे पुलांच्या कामाचा सातत्याने आढावा घेऊन त्यावर उपाययोजना करणे महापालिकेस शक्य होणार आहे.

Pune Bridge Repairs
Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

१५ पुलांसाठी आठ कोटी

महापालिकेने पहिल्या टप्प्यात ११ पैकी १० पुलांची, तर दुसऱ्या टप्प्यात १७ पैकी ११ पुलांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण केली आहेत. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील सात पुलांसह उर्वरित पुलांच्या दुरुस्तीचे काम तिसऱ्या टप्प्यात केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी १० कोटींची, तर दुसऱ्या टप्प्यासाठी १७ कोटींची कामे झाली आहेत. तिसऱ्या टप्प्यातील पुलांच्या दुरुस्तीसाठी आठ कोटी रुपये अंदाजपत्रकात मंजूर केले आहेत. यातून १४ ते १५ पुलांच्या दुरुस्तीची कामे होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com