Pune : शरीरविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांची दिवाळी झाली आनंदी व गोड

शरीरविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांना किल्ले आकाश कंदील व दिवाळीचा फराळ देऊन अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.
pune
punesakal

पाली : पालीतील अंकुश आपटे यांनी त्यांच्या आयुष्य व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रातर्फे दिवाळी सणाचे औचित्य साधून पुण्यातील बुधवार पेठेतील शरीरविक्री करणाऱ्या महिलांच्या मुलांना तेथे जाऊन किल्ले, आकाश कंदील व दिवाळीचा फराळ दिला आणि अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.

यावेळी लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य व आनंद खूप काही सांगून जात होता. यावेळी येथील महिला म्हणाल्या की इतक्या वर्षात पहिल्यांदा आमच्या घरात लहान मुलांसाठी कोणीतरी खाऊ व दिवाळीचे साहित्य आणले आहे. या विधायक उपक्रमामुळे खूप समाधान मिळाले. विविध सणांमध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे विधायक व लोकोपयोगी उपक्रम नियमित राबवित असतो असे अंकुश आपटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com