

Pune Incident Building Slab Falls Several Feared Trapped Rescue in Progress
Esakal
पुण्यातील एका हॉटेलजवळ बांधकाम सुरू असताना स्लॅब कोसळल्याची घटना घडली. यात दोघेजण अडकल्याची माहिती समोर आली होती. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अग्निशमन दलाने दोघांना सुखरुप बाहेर काढलं आहे. इमारतीचं पुर्नबांधकाम सुरू असताना ही घटना घडली.