Pune : 'सेक्स तंत्रा'ला विरोध; पुण्यातलं 'ते' शिबीर अखेर रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sex Tantra Camp

Pune : 'सेक्स तंत्रा'ला विरोध; पुण्यातलं 'ते' शिबीर अखेर रद्द

पुण्यात नवरात्रीच्या काळात आयोजित करण्यात आलेलं सेक्स तंत्र शिबिर रद्द करण्यात आलं आहे. या शिबिराला अनेकांनी विरोध केल्यानंतर आता अखेर हे शिबिर रद्द करण्यात आलं आहे. या शिबिराच्या माध्यमातून लैंगिक प्रशिक्षण देण्यात येणार होतं.

हेही वाचा: धक्कादायक ! नवरात्र उत्सवानिमित्त पुण्यात लैंगिक प्रशिक्षण देण्याचा प्रकार उघड

या सेक्स तंत्र शिबिराची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत होती. त्यानंतर या शिबिराला जोरदार विरोध होत होता. १ ते ३ ऑक्टोबर या काळात पुण्यात हे शिबिर होणार होतं. यासाठी १५ हजार रुपये फीही आकारण्यात येणार होती. मात्र आता विरोध लक्षात घेऊन आयोजकांनी हे शिबिर रद्द केलं आहे.

हेही वाचा: Osho Ashram: 'संभोग से समाधी' ओशो आश्रमात नक्की काय चालतं? HIV टेस्टशिवाय...

या शिबिराला होणाऱ्या विरोधानंतर उत्तर प्रदेशातले आयोजक रवि सिंग यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. उत्तर प्रदेशातल्या सत्यम शिवम सुंदरम या संस्थेमार्फत हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये लैंगिक प्रशिक्षण देण्यात येणार होतं. मात्र विविध राजकीय पक्षांनी याला केलेल्या विरोधामुळे हे शिबिर रद्द करण्यात आलं. मात्र तरीही पोलीस या शिबिराच्या आयोजकांचा शोध घेत आहेत.

Web Title: Pune Camp Of Sex Tantra Cancelled Due To Oppose Of Many Politicians

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..