

Crashed Honda City car after colliding with the Pune Metro pillar on Paud Road
esakal
Summary
सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश बालगुडे आणि त्यांच्या मित्रांनी जखमीला बाहेर काढून मदत केली.
अपघात रात्री साडेअकरा ते पावणे बारा वाजण्याच्या दरम्यान घडला.
कारचालकाने मद्यपान केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
Pune News: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील बंडगार्डन मेट्रो स्टेशनला मेट्रो स्टेशनच्या खांबाला कार धडकून झालेल्या अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक भीषण अपघात घडला. एक भरधाव कार पौड रस्त्यावरीव मेट्रोस्थानकाच्या पिलरला धडकल्यामुळे कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. सुदैवाने गाडीमधील एअर बॅग मुळे चालक बचावला. काही तरुण कार्यकर्त्यांनी जखमीला तातडीने बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला.