उरुळी कांचन : चारचाकी गाडीची काच फोडून पन्नास हजार लंपास

नवनाथ थोरात हे बोरिऐंदी येथून उरुळी कांचन या ठिकाणी चार चाकी गाडी घेऊन आले होते.
चारचाकी गाडीची काच फोडून पन्नास हजार लंपास
चारचाकी गाडीची काच फोडून पन्नास हजार लंपासsakal

उरुळी कांचन : उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील डॉ. मानिभाई देसाई पतसंस्थेच्या बाहेर लावलेल्या चारचाकी गाडीची काच फोडून ५० हजार रुपये अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना सोमवारी (ता.०१) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. राजेंद्र खंडू तावरे (वय- ४९, रा. बोरिऐंदी, ता. दौंड ) असे काच फोडून पैसे चोरीला गेलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र तावरे व त्यांचे मित्र नवनाथ थोरात हे बोरिऐंदी येथून उरुळी कांचन या ठिकाणी चार चाकी गाडी घेऊन आले होते. दिवाळी सन असल्याने कामगारांच्या पगारी करण्यासाठी पुणे सोलापूर महामार्गाच्या बाजूला असलेल्या आयसीआयसीआय बँकेतून सकाळी पाऊने अकरा वाजण्याच्या सुमारास चेकद्वारे १ लाख रुपये रोख रक्कम काढली. पैसे काढल्यानंतर ते त्या ठिकाणावरून ५० हजार रुपये बदलण्यासाठी उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील डॉ. मानिभाई पतसंस्था या ठिकाणी गेले. व राहिलेले पन्नास हजार रुपये त्यांनी गाडीमध्ये ठेवले होते.

चारचाकी गाडीची काच फोडून पन्नास हजार लंपास
सांगली : आम्ही सदस्यपदाचाही राजीनामा फडणवीसांकडे देऊ

दरम्यान, पतसंस्थेतून नोटा बदलून आले असता त्यांना डाव्या बाजूच्या गाडीची काच फुटलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यांनी गाडीत ठेवलेली रक्कम पाहिली असता ती दिसून आली नाही. आजूबाजूला लोकांपाशी तसेच नागरिकांना विचारपूस केली मात्र कोणीही काही पहिले नाही असे सांगितले. यावरून कोणीतरी आपल्या गाडीतून रोख रक्कम पन्नास हजार रुपये चोरून नेल्याची खात्री झाली. ही घटना समजताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड त्या ठिकाणी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम लोणी काळभोर पोलीस ठाण्यात सुरु आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गायकवाड करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com