

Pune Drunk Driving Viral Video
Viral Video: दारूच्या नशेत रस्त्यावर धुमाकूळ घालत भरधाव चारचाकीतून स्टंटबाजी करणाऱ्या तरुणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हातात बिअरच्या बाटल्या घेत चारही बाजूच्या काचा उघडून आणि कंबरेपासून शरीर बाहेर काढत तरुणांनी केलेली ही स्टंटबाजी पाहून नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.