esakal | गुंडाच्या रॅलीसाठी 'Chopper'चा धाक दाखवून नेली जीप; 8 जणांवर गुन्हे दाखल, दोघांना अटक

बोलून बातमी शोधा

 Pune case filed against 8 and 2 arrested for theft of jeep  threat of Chopper Rally of goons}

संतोष धुमाळ (वय 38, रा. मुळशी) व मुसा इलाही शेख (वय 29, रा.कोथरुड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कोथरुड येथे राहणाऱ्या एका नागरीकाने फिर्याद दिली आहे.

गुंडाच्या रॅलीसाठी 'Chopper'चा धाक दाखवून नेली जीप; 8 जणांवर गुन्हे दाखल, दोघांना अटक
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे : सराईत गुंडाच्या रॅलीसाठी नागरीकास चॉपरचा धाक दाखवून त्याची जीप नेल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने निलेश घायवळ टोळीतीन आठ जणांविरुद्ध कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून गुंड गजा मारणे, शरद मोहोळ या दोघांनंतर आता घायवळ टोळीच्या मुसक्‍या आवळण्यास सुरूवात केली आहे. 

संतोष धुमाळ (वय 38, रा. मुळशी) व मुसा इलाही शेख (वय 29, रा.कोथरुड) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कोथरुड येथे राहणाऱ्या एका नागरीकाने फिर्याद दिली आहे. त्यावरुन धुमाळ, शेख, कुणाल कंधारे, मुसाफ इलाही, अक्षय गोगावले, विपुल माझीरी यांच्यासह त्यांच्या तीन साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पूजा चव्हाण मृत्यू : दोघं कुठं गेले? घटनेनंतर दिली होती कबुली; चित्रा वाघ यांचा खुलासा 

घायवळच्या रॅलीसाठी वाहनांची आवश्‍यकता होती. त्यावेळी धुमाळने त्याच्या साथीदारांना कोथरुड येथे राहणाऱ्या एका नागरीकाकडून त्याच्याकडील जीप आणण्यास सांगितले. त्यानुसार, आरोपींनी फिर्यादीला गाठून त्यांना चॉपरचा धाक दाखवून जबरदस्तीने त्यांच्याकडील जीप घायवळच्या रॅलीसाठी घेऊन गेले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी धुमाळ व शेख या दोघांना अटक केली. 

दरम्यान, गजा मारणे, शरद मोहोळ, निलेश घायवळ हे तिन्हीही गुंड सध्या जामीनावर किंवा प्रकरणाचा निकाल लागल्याने कारागृहाबाहेर पडले आहेत. एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे तिन्हीही गुंड आता बाहेर असल्याने शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्ध भडकण्याची शक्‍यता आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून सगळ्याच टोळ्यांमधील आरोपींच्या मुसक्‍या आवळण्यास सुरूवात झाली आहे.


पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण - पुणे पोलिसांची भूमिका संशयास्पद, तपास काढून घ्या