

Census Review Meeting: PMC Expresses Dissatisfaction over Slow Progress
esakal
पुणे : जनगणनेच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, या कामात टाळाटाळ करू नये, ठरवून दिलेल्या वेळेत घरभेटी पूर्ण करा असा इशारा पुणे महापालिका प्रशासनाने दिला आहे. आज (ता. २३) जनगणनेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती. त्यात पुणे शहराची समाधानकारक प्रगती दिसून न आल्याने ही तंबी दिली आहे.