Chandani Chowk Flyover : चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्‍घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्‍घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला. १५ जुलैला या उड्डाणपुलाचे उद्‍घाटन होणार आहे.
Chandani Chowk
Chandani ChowkSakal

पुणे - चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्‍घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला. १५ जुलैला या उड्डाणपुलाचे उद्‍घाटन होणार आहे. या पुलासंदर्भातील उर्वरित कामे मुदतीच्या आत पूर्ण करा, अशा सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) अधिकाऱ्यांना गुरुवारी दिल्या. दरम्यान, या प्रकल्पाचा भाग असलेल्या ला कासा सोसायटीजवळील सेवा रस्त्यावरून गुरुवारी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना साताऱ्याला जाता येणे शक्य झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Chandani Chowk
Pune Crime : पोलिसांनी दोन तास सिने स्टाईलने पाठलाग करून डिझेल चोरांना नागरिकांच्या मदतीने पकडले

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे भूमीपूजन २०१७ मध्ये गडकरी यांच्या हस्ते झाले होते. त्यानुसार हे काम २०२१ मध्ये काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, भूसंपादन, तांत्रिक अडचणी, वाहतूक आणि कोरोनामुळे हे काम रखडत गेले, परंतु या चौकातील कोंडीचा फटका अनेक सर्वसामान्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही बसला. त्यानंतर या प्रकल्पाच्या कामांनी गती घेतली. त्यानंतर हा प्रकल्प ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. रस्त्यांचे रुंदीकरण, जुना उड्डाणपूल पाडून नवा बहुमजली उड्डाणपूल बांधण्यास सुरुवात झाली.

मात्र, अस्तित्वातील पूल पाडण्यात अडथळा येत असल्यामुळे ३१ जानेवारीचाही मुहूर्त टळला. त्यानंतर उड्डाणपुलाचे उद्‍घाटन एक मे रोजी करण्याचा प्रयत्न होता, परंतु या मुदतीतही पुलाचे काम न झाल्याने त्याचे उद्‍घाटन लांबणीवर पडले.

अखेर हा मार्ग कधी खुला होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. विविध कार्यक्रमांसाठी गडकरी आज पुण्यात आले होते. या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून या प्रकल्पाचा आढावा घेतला. या वेळी एनएचएआयचे प्रकल्प संचालक संजय कदम उपस्थित होते.

Chandani Chowk
Pune : शाळांमध्ये ‘स्काउट गाइड अनिवार्य करणार; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

एक जूनला गर्डर टाकण्याचे काम!

संजय कदम या बैठकीनंतर म्हणाले, ‘‘चांदणी चौकातील मार्गाचे काम ९३ टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित सात टक्क्यांमध्ये उड्डाणपुलाच्या कामाचा समावेश आहे. पुलाच्या दोन्ही बाजूकडील गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. येत्या एक जून रोजी मध्यभागातील गर्डर टाकण्याचे काम सुरू होणार आहे. सेवा रस्त्यांचे काम पूर्ण झाल्याने मध्यभागी टाकण्यात येणाऱ्या गर्डरसाठी वाहतूक थांबविण्याची गरज नाही. ही वाहतूक सेवा रस्त्यांवरून सुरू राहील. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. तसेच रंगरंगोटीची कामे शिल्लक आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून पुलाचे येत्या १५ जुलैला उद्‍घाटन करण्याचे वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आदेश दिले आहेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com