Pune : शाळांमध्ये ‘स्काउट गाइड अनिवार्य करणार; शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

खासगी शाळांमध्ये शिकविले जाणारे सर्व विषय सरकारी शाळांमध्ये शिकवले जातात. केवळ इंग्रजीच्या हव्यासापोटी पालकांनी खासगी शाळांच्या मक्तेदारीला बळी पडू नये
deepak kesarkar
deepak kesarkar sakal

पुणे - विद्यार्थ्यांमध्ये श्रमाची प्रतिष्ठा रुजवायला हवी. व्यक्तीमत्त्व विकास आणि कौशल्याधारीत प्रशिक्षणासाठी प्राथमिक शाळांमध्ये ‘स्काऊट गाईड’ अनिवार्य करणार आहोत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

deepak kesarkar
Education Material Rates Hike: शालेय स्टेशनरी, वह्यांच्या किमतीत वाढ! पालकांच्या खिशाला बसणार झळ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे मत व्यक्त केले. खासगी शाळांच्या वाढत्या मक्तेदारी विषयी बोलताना ते म्हणाले, ‘‘खासगी शाळांतील प्रत्येक उपक्रमात पालकांना आर्थिक दृष्ट्या सहभागी होणे शक्य नाही. अशावेळी मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो.

deepak kesarkar
Pune Crime : पोलिसांनी दोन तास सिने स्टाईलने पाठलाग करून डिझेल चोरांना नागरिकांच्या मदतीने पकडले

खासगी शाळांमध्ये शिकविले जाणारे सर्व विषय सरकारी शाळांमध्ये शिकवले जातात. केवळ इंग्रजीच्या हव्यासापोटी पालकांनी खासगी शाळांच्या मक्तेदारीला बळी पडू नये.’’ यावेळी ‘नर्सरी’ शाळांना सरकारी परवानगी आणि नियमणासाठी कडक निर्बंध लादू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

deepak kesarkar
Mumbai : सोशल मीडियावर महिला पोलिसांबद्दल अश्लील विधाने; पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद

ते म्हणाले, ‘‘या पुढचे शिक्षण हे मराठीतूनच असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. पालकांनीही आता इंग्रजी माध्यमाचा हव्यास सोडायला हवा. खासगी प्राथमिक शिक्षणाला जेवढी शिस्त लावता येईल, तेवढा प्रयत्न आम्ही करतोय.’’ नव्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस आधीचा गणवेश आणि तीन दिवस आताचा नवा गणवेश असेल, असेही त्यांनी सांगितले.

deepak kesarkar
Mumbai Trans Harbour Link : असा असेल मुंबईचा नवा सागरी सेतू

शिक्षक भरती पूर्ण करणार

राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या भरती संदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शिक्षक भरतीला ५ जून पर्यंत स्थगिती दिली आहे. ती उठल्यावर आम्ही तातडीने शिक्षक भरती पूर्ण करू, राज्यातील प्रत्येक प्राथमिक शाळेला शिक्षक मिळणार, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com