
Pune Accident: पुण्यातील चांदणी चौकात लोखंडी सळ्या घेऊन जाणारा ट्रेलरचा अपघात एका इर्टिगा चालकामुळं झाल्याचं आता समोर आलं आहे. इर्टिगा कार चालकानं ट्रेलरला आडवी कार घालून टर्न घेण्याचा प्रयत्न केला. पण यामुळं ट्रेलर चालकानं दोरदार ब्रेक मारल्यानं इर्टिगावाला वाचला पण ट्रेलरमधील लोड असलेल्या सळ्या ट्रेलर चालकाच्या शरिरात घुसल्या अन् त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याचबरोबर त्याच्या एका सहकाऱ्याचा देखील यात मृत्यू झाला आहे. पण इर्टिगाचा चालक मात्र तिथून निघून गेला. हिंजवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही दुर्घटना घडली.