Vandana Chavan : 'हम करे सो कायदा चालणार नाही' हे चंद्रकांत पाटील यांनाच लागू होते

बालभारती-पौड फाटा रस्त्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'हम करे सो कायदा' चालणार नाही" असे म्हंटले होते, ते वाक्य त्यांनाच लागू होते.
Vandana Chavan and Chandrakant Patil
Vandana Chavan and Chandrakant PatilSakal
Summary

बालभारती-पौड फाटा रस्त्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'हम करे सो कायदा' चालणार नाही" असे म्हंटले होते, ते वाक्य त्यांनाच लागू होते.

पुणे - बालभारती-पौड फाटा रस्त्याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'हम करे सो कायदा' चालणार नाही" असे म्हंटले होते, ते वाक्य त्यांनाच लागू होते. पाटील यांना पुण माहिती नाही, चंद्रकांत दादांनी पुणेकरांचे मन व प्रेम जाणून घ्यावे' अशा खरपूस शब्दात खासदार वंदना चव्हाण यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.

बालभारती-पौड फाटा या प्रस्तावित रस्त्याला वेताळ टेकडी बचाव कृती समिती व नागरिकांचा विरोध आहे. आत्तापर्यंत नागरिकांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपला रोष व्यक्त केला आहे. दरम्यान, समितीच्या नागरिकांनी नुकतीच पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली. त्यांनी टेकडी बाबतचे त्यांचे सादरीकरण पाटील यांच्यापुढे सादर करण्याची वेळ मागितली. त्यास पाटील यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन सादरीकरण करण्यास सुचविले. त्यानुसार लवकरच त्यांची बैठक होणार आहे.

दरम्यान, नागरिकांचा, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह काही राजकीय पक्ष यांच्या होणाऱ्या विरोधवर पालकमंत्री पाटील यांनी 'हम करे सो कायदा चालणार नाही' असे म्हंटले होते. दरम्यान, वेताळ टेकडी बचाव कृती समितीतर्फे जनजागृतीसाठी 15 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता वेताळ बाबा चौक येथे शांतता फेरी आयोजित केली आहेत.त्याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी चव्हाण यांना विचारणा करण्यात आली.

चव्हाण म्हणाल्या, 'हम करे सो कायदा चालणार नाही" असे म्हंटले होते, ते वाक्य त्यांनाच लागू होते. आमदार म्हणून पुण्यासाठी ते नवीन आहेत. त्यामुळे पाटील यांना पुण अजून माहिती नाही, चंद्रकांत दादांनी पुणेकरांचे मन व प्रेम जाणून घ्यावे.' संबंधित कामाचे किंवा नदी सुधार प्रकलपातील काम कोणत्या कंत्राटदाराला दिले आहे, यांच्याशी आमचे काही देणे घेणे नाही. नदी सुधारमुळे नदीची वहन क्षमता कमी होईल आणि पुढे पूरस्थिती निर्माण होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टेकड्या वाचवा ही राष्ट्रवादीची भूमिका

शहरातील वेताळ टेकडीसहा अन्य टेकड्या वाचल्या पाहिजेत. वेताळ टेकडीवर प्राणी, पक्षी, जंगल, झरे आहेत. ते पुढच्या पिढ्यांसाठी टिकविले पाहिजेत. बालभारती पौड फाटा रस्ता आणि अन्य दोन बोगदे यांच्यामुळे विकास तर होणार नाही, याउलट स्थानिक नागरिकांची घरे देखील जाणार आहेत. पर्यावरणाचा समतोल बिघडणार आहे. त्यामुळे हा रस्ता होऊ नये, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या सह आमची भूमिका आहे. हीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका आहे., असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com