Pune : वानवडी सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषारोपपत्र दाखल

एकूण १९ आरोपींचा समावेश
crime news
crime newssakal

पुणे : मित्राला भेटण्यासाठी मुंबई येथे निघालेल्या १४ वर्षीय मुलीचे मदतीच्या बहाण्याने रिक्षातून अपहरण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार प्रकरणात वानवडी पोलिसांनी १७ आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे.

या मुलीवर एकूण १४ जणांनी निर्जनस्थळी, जंगलात, लॉज आणि रेल्वे कार्यालय अशा ठिकाणी नेवून तिच्यावर बलात्कार केल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबर्इत देखील तिच्यावर एका आरोपीने अत्याचार केला होता. या गुन्ह्यात तिचा मित्र, दोन हॉटेल व्यावसायिक आणि अत्याचार करणारे १९आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे. संबंधित अल्पवयीन मुलीवर पुणे स्टेशन परिसरातील रिक्षा चालकांनी तसेच रेल्वे दलातील दोघा कर्मचाऱ्यांसह तिच्या मित्रांनी ठिकठिकाणी बलात्कार केल्याचा गुन्हा सप्टेंबर महिन्यात उघडकीस आला.

crime news
ST STRIKE: सरकारने निवडला खासगी वाहतुकीचा पर्याय

या मुलीच्या मित्राने तिला मुंबर्इत बोलावले होते. त्यासाठी ती स्टेशनवर गेली होती. त्यावेळी हा प्रकार घडला. या मुलीवर तिच्या मित्राने व त्याच्या साथीदारांनीही ठाण्यामध्ये अत्याचार केले होते. त्यानंतर ती मुलगी मित्रासमवेत परराज्यात गेली होती. तेथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले. या घटनेमध्ये एकंदर १७ आरोपी असल्याची माहिती पुढे आली होती. पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध साक्षी, वैद्यकीय व परिस्थितीजन्य पुराव्यानिशी शिवाजीनगर न्यायालयात तपशीलवार दोषारोपपत्र दाखल केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com