बाजीराव रस्त्यावरील आगीत पुणेकरांनी घडविले माणुसकीचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

पुणे : इमारतीमधील दुकानाला लागलेली आग विझविण्यासाठी, लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान सकाळपासून प्रयत्न करत होते तर, दूसरीकडे 50-100 पोलिस नागरिकांवर नियंत्रण ठेवत होते. आग विझली, रहिवासीही सुरक्षित बाहेर पडले. हे सगळे पाहणाऱ्या समोरच्या सोसायटीतील नागरिकांनी पुढे येत तहानलेल्या अग्निशामक जवान, पोलिसांना चहा, कोकम देत माणुसकीचे दर्शन घडविले.​

पुणे : इमारतीमधील दुकानाला लागलेली आग विझविण्यासाठी, लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान सकाळपासून प्रयत्न करत होते तर, दूसरीकडे 50-100 पोलिस नागरिकांवर नियंत्रण ठेवत होते. आग विझली, रहिवासीही सुरक्षित बाहेर पडले. हे सगळे पाहणाऱ्या समोरच्या सोसायटीतील नागरिकांनी पुढे येत तहानलेल्या अग्निशामक जवान, पोलिसांना चहा, कोकम देत माणुसकीचे दर्शन घडविले.

बाजीराव रस्त्यावरील दक्षिणमुखी मंदिराजवळील मेहुणपूरा येथील जोशी संकुल या इमारतीमधील एका दुकानाला गुरुवारी सकाळी सव्वा आठ वाजता आग लागली. आग विझविण्यासाठी, जिवाच्या आकांताने इमारतीच्या टेरेसवर गेलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान झटत होते. त्यांना पोलिस अधिकारी, कमर्चारी मदत करत होते.

उन्हाचा पारा वाढत होता. आगीच्या ज्वाला, धुरामध्ये घुसून जवान बऱ्याच आग विझवित होते. बऱ्याच वेळानंतर धुर बाहेर काढण्यात जवानांना यश आले. त्यानंतर हळूहळू जवान बाहेर पडु लागले. त्याच वेळी काही महिला, पुरुष जवानांना कोकम देऊ लागले. तर काही जण चहा बिस्किट देत होते. जोशी संकुल इमारतीसमोरील पाटे संपदा अपार्टमेंटमधील नागरिकांनी माणुसकीचे दर्शन घेत, कोकम, चहा देण्यास प्राधान्य दिले. इतर वेळी आग विझल्यानंतर कोणीही विचारणा करत नसताना अग्निशामक दलाच्या जवानांना हा क्षण आनंद देऊन गेला.

"सकाळपासून 4-5 तास जवान, पोलिस काम करत आहेत. त्यांचे घसे कोरडे झालेले आम्ही पाहिले. आपण किमान त्यांना चहा पाणी तरी विचारावे, या हेतुने आम्ही त्यांना चहा, बिस्किट कोकम दिला."
- स्मिता चंद्रकांत पाटील, निवृत्त शिक्षिका, पाटे संपदा अपार्टमेंट रहिवासी.
 

Web Title: Pune Citizen shows humanity for fireman and police