पुणेकरांनो, घरातच राहा! पुणे जिल्ह्याला पुन्हा ऑरेंज अलर्ट

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण रहाणार आहे.

पुणे, ता. १५ : पुणे जिल्ह्याला गुरूवारी पुन्हा हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. त्यामुळे जिल्ह्यात दिवसभरात ६४.५ ते ११५.५ मिलीमीटर पाऊस कोसळेल असेही स्पष्ट केले.

हेही वाचा - मुसळधार पावसाने उडवली पुणेकरांची झोप; जाणून घ्या १४ ऑक्टेबरच्या रात्री कुठं काय घडलं?

शिवाजीनगर येथील वेधशाळेत बुधवारी सकाळी साडेआठ ते गुरूवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ११२.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यापैकी ७६ मिलीमीटर पाऊस बुधवारी रात्री साडेआठ ते साडेअकरा या वेळेत झाला. त्यामुळे पुणे पावसाच्या पाण्यात अक्षरश: वेढले गेले. रात्री बारा वाजल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. रात्री साडेअकरा ते अडीच यावेळेत १५.४ मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. या पार्श्वभूमिवर हवामान खात्याने गुरूवारी परत पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. 

हेही वाचा - Heavy Rain: सहा तासांचा थरार, पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवले!
पुण्यात दिवसभर ढगाळ वातावरण रहाणार आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळतील असा अंदाज हवामान खात्याने दिला. विजांचा गडगडाटासह हा पाऊस पडणार असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी थांबावे, असे आवाहनही केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune citizen stay at home orange alert for pune district due to heavy downfall