Heavy Rain: सहा तासांचा थरार, पुरात वाहून जाणाऱ्या दोघांना वाचवले!

राजकुमार थोरात
Thursday, 15 October 2020

निरवांगीच्या पुलावरुन साडेसात वाजण्याच्या सुमारास पाणी वाहत असताना निमसाखर बाजूकडून शिंदे व देशमुख हे दोघे जण दुचाकीवरुन निरवांगीकडे चालले होते. ओढ्याला आलेले पाणी पाहून त्यांनी दुचाकी रस्त्यालगत लावून पाण्यातून चालत जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. शिंदे व  देशमुख या दोघांनी एकमेकांच्या हाताला धरुन पाण्यात उभे असताना देशमुख यांचा हात सुटल्याने ते ओढ्याच्या पूराच्या पाण्यामध्ये वाहून जावू लागले.

वालचंदनगर : निरवांगी (ता.इंदापूर) येथील बीकेबीएन रस्त्यावरील ओढ्याच्या पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी व प्रशासनाने वाचविले.सहा तासानंतर बोटीच्या एकाला बाहेर काढण्यात यश आले. या घटनेमध्ये कल्याण किसन शिंदे ( वय ३७) व अशोक मारुती देशमुख (४५, रा. दोघे मूळ,रा. सिद्धेश्‍वर कुरोली ता.खटाव) यांना ओढ्याच्या  पुराच्या पाण्यातून ग्रामस्थांनी व प्रशासनाने सुखरुप बाहेर काढले.

बुधवारी (ता.१४) रोजी  इंदापूर तालुक्यामध्ये सायंकाळी सहा नंतर मुसळधार ढगफुटीचा पाऊस झाला. पावसामुळे बीकेबीएन (बारामती-कळंब-बावडा-नरसिंगपूर) रस्त्यावरील तावशी, चिखली, निमसाखर, निरवांगी पुलावरुन पाणी वाहत हाेते. निरवांगीच्या पुलावरुन साडेसात वाजण्याच्या सुमारास पाणी वाहत असताना निमसाखर बाजूकडून शिंदे व देशमुख हे दोघे जण दुचाकीवरुन निरवांगीकडे चालले होते.

Breaking : मुसळधार पावसाचा फटका; पुणे विद्यापीठाचे आजचे पेपर पुढे ढकलले

ओढ्याला आलेले पाणी पाहून त्यांनी दुचाकी रस्त्यालगत लावून पाण्यातून चालत जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. शिंदे व  देशमुख या दोघांनी एकमेकांच्या हाताला धरुन पाण्यात उभे असताना देशमुख यांचा हात सुटल्याने ते ओढ्याच्या पूराच्या पाण्यामध्ये वाहून जावू लागले. तर शिंदे यांना  जवळच्या झाडाला पकडले. दोघांनी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने शिंदे यांना ट्रॅक्टरच्या साहय्याने पाण्यामधून बाहेर काढले.

देशमुख हे ओढ्यालगतच्या झाडावरती सहा तासापासून बसले. इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी रात्री एक वाजण्याच्या सुमारास प्रशानाच्या मदतीने मोटीमधून देशमुख यांची सुखरुप सुटका केली. 
 

आणखी बातम्या 
मुसळधार पावसाने उडवली पुणेकरांची झोप; वाचा काल रात्री काय घडलं?
व्हिडिओ:दगडूशेठ हलवाई मंदिरासमोरून वाहिले पाण्याचे लोंढे
पुण्यात पावसाचे थैमान, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Nirwangi villagers rescued the two who were swept away by the flood waters