पुणेकरांनी कसा साजरा केला व्हॅलेंटाइन डे? जाणून घ्या

Valentines_day
Valentines_day

Valentines Day 2021 : पुणे : 'व्हॅलेंटाइन डे' प्रेमी युगुलांचा एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. रविवारची सुट्टी आणि याच 'व्हॅलेंटाइन डे'चे निमित्त साधत प्रेमी युगुलांनी एकमेकांना गुलाबाची फुले, सॉफ्ट टॉय, चॉकलेट्स, गिफ्ट आणि असे बरेच काही देत हा दिवस साजरा केला. काहींनी 'लॉंग ड्राईव्ह', 'डिनर डेट'ला प्राधान्य दिले. तर बहुतांश नागरीकांनी आपल्या परिवारासमवेत 'व्हॅलेंटाइन डे' साजरा करीत हॉटेल्समध्ये जेवणाचा बेत करून काही प्रमाणात शहरात फिरण्यालाही प्राधान्य दिले.

'व्हॅलेंटाइन डे'मुळे रविवारी शहरातील महात्मा गांधी रस्ता, कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, जंगली महाराज रस्ता, सेनापती बापट रस्ता असा परिसर लाल फुगे आणि गुलाबाच्या फुलांनी सजलेला होता. बहुतांश हॉटेल्स, रेस्टॉरंटस्‌, कॅफे, आइस्क्रीम पार्लर येथे खास विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर उद्यानांभोवती फुले आणि फुगे विक्रेत्यांनी प्रेमी युगुलांची वाट पाहत गर्दी केली होती. बहुतांश प्रेमी युगुलांनी शहरामधील महत्त्वाच्या रस्त्यांवरून, परिसरांमध्ये दुचाकी, कारमध्ये फेरफटका मारण्यास प्राधान्य दिले. त्यानंतर चॉकलेट, केक, शॉपिंग करून झाल्यानंतर त्यांची पावले आपापल्या आवडत्या हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्ये वळली. तेथे आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतर त्यांनी हातामध्ये फुगे, फुले घेऊन पुन्हा फिरण्यास पसंती दिली.

तरुण-तरुणींचे समूह शहरातील कॅफे, हॉटेल्स आणि उद्यानात जमले. एकमेकांना गुलाब, ग्रीटिंग कार्ड देत त्यांनीही या दिवसाचा आनंद साजरा केला. केवळ प्रियकर किंवा प्रेयसीच नाही, तर आपापल्या मित्र मैत्रिणींसोबत
फिरण्याचा, आउटींग, पार्टीचा बेतही अनेकांनी आखून पूर्ण केला. कोरोनाच्या
पार्श्‍वभूमीवर अद्याप महाविद्यालये बंद असल्याने महाविद्यालयांभोवती
"व्हॅलेंटाइन'चे वातावरण यंदा फारसे रंगले नाही. मात्र तेच चित्र शहरातील
विविध हॉटेल्स, कॅफेमध्ये दिसून आले. फक्त जोडपेच नाही, तर बहुतांश
नागरिकांनी प्रेमाचा हा दिवस आपल्या कुटुंबातील प्रियजनांसमवेत साजरा
केला. फर्ग्युसन रस्ता, कॅम्प, कोरगाव पार्क येथे दरवर्षीच्या तुलनेत
गर्दीचे प्रमाण कमी होते.

'व्हॅलेंटाइन डे'लाही सामाजिक भान
काही तरुण-तरुणींनी व्हॅलेंटाइन डे शहरातील विविध सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांसमवेत काम करून घालविला. काहींनी अनाथाश्रम, वृद्धाश्रमांना भेट देऊन त्यांच्यासमवेत आनंदोत्सव साजरा केला. छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोरील कट्ट्यांवर लाल फुग्यांची सजावट करून खास प्रेमाच्या कविता आणि शेरो-शायरीचे फलक लावण्यात आले होते. ते पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com