#IWillVote विधानसभेसाठी आज मतदान; शहर, जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज

#IWillVote विधानसभेसाठी आज मतदान; शहर, जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणा सज्ज

Vidhan Sabha 2019 :

विधानसभा  2019

पुणे - गेला महिनाभर पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या उमेदवारांच्या नशिबावर उद्या (सोमवारी) मतदारराजा शिक्कामोर्तब करणार आहे. ‘आजि कर्तव्याचा दिनु...’ म्हणत मतदानाचे कर्तव्य बजावण्यासाठी मतदार, तर मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांतील २१ जागांसाठी २४६ उमेदवार रिंगणात आहेत. ७७ लाख २९ हजार २१७ मतदार असून, ७ हजार ९१५ मतदान केंद्रे आहेत. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर नियुक्त केलेले कर्मचारी व अधिकारी ईव्हीएम मशीन व निवडणूक साहित्यासह पोचले आहेत. निवडणुकीसाठी बॅलेट युनिट १३ हजार ९५५, कंट्रोल युनिट ९,६९५ आणि व्हीव्हीपॅट १० हजार ६२२ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 

प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्‍यक मनुष्यबळ, पोलिस बंदोबस्त, संवेदनशील मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग, भरारी पथके व क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती अशी चोख तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वत्र दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. मतदान केंद्रांमध्ये कुठे गळती आहे का, असेल तर तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेला देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पावसामुळे ग्रामीण भागात मतदान केंद्रांवर जाण्यासाठी रस्ते नीट आहेत का, हे तपासून आवश्‍यक तेथे मुरुम  टाकून रस्ते सुस्थितीत करण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

संवेदनशील केंद्रांवर  सूक्ष्म निरीक्षक
जिल्ह्यात २५२ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघात एकूण ११४ मतदान केंद्रे संवेदनशील आहेत. त्या ठिकाणी ४१५ सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहेत. या ठिकाणच्या मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग केले जाणार आहे. तसेच जादा पोलिस बंदोबस्त असणार आहे. 


मतदानासाठी ओळखपत्रे 
  पासपोर्ट
  ड्रायव्हिंग लायसन्स
  राज्य व केंद्र शासन, सार्वजनिक क्षेत्रातील, पब्लिक लिमिटेड कंपनीतील कर्मचाऱ्यांचे फोटो असलेले ओळखपत्र, 
  बॅंक व पोस्ट कार्यालयाने फोटोसह दिलेले पासबुक
  पॅन कार्ड      आधार कार्ड
  राष्ट्रीय जनसंख्या रजिस्ट्रारने दिलेले स्मार्ट कार्ड
  मनरेगा जॉब कार्ड
  श्रम मंत्रालयाच्या योजनेद्वारे दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड
  पेन्शन ओळखपत्र 
  खासदार, आमदार यांनी दिलेले ओळखपत्र 

विधानसभा मतदारसंघ    एकूण मतदार    मतदान केंद्र 
जुन्नर-     २,९९,६४८                        ३५६ 
आंबेगाव-     २,८२,८३२ -     ३३६ 
खेड-आळंदी- ३,२७,२६२ -    ३७९ 
शिरूर-     ३,८३,८८६-     ३८९ 
दौंड-     ३,०९,१६८ -     ३०६ 
इंदापूर -     ३,०५,५७९ -     ३२९ 
बारामती-     ३,४१,६५७ -     ३६८ 
पुरंदर-    ३,६१,४८० -     ३८० 
भोर-    ३,६१,४१५ -     ५२९ 
मावळ -     ३,४८,४६२ -     ३७० 
चिंचवड -     ५,१८,३०९ -     ४९१ 
पिंपरी-     ३,५३,५४५ -     ३९९ 
भोसरी -     ४,४१,१२५ -     ४११ 
वडगाव शेरी- ४,५६,४४८ -     ४२५ 
शिवाजीनगर -३,०५,५८७ -     २८० 
कोथरूड -     ४,०४,७६५ -     ३७० 
खडकवासला -४,८६,९४८ -     ४४६ 
पर्वती -     ३,५४,२९२ -     ३४४ 
हडपसर-     ५,०४,०४४ -     ४५४ 
पुणे कॅंटोन्मेंट -२,९१,३४४ -     २७४ 
कसबा पेठ -     २,९०,६८३ -     २७९ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com