पुणे : शहर आणि परिसरात जोरदार पावसाला सुरूवात

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून शहर आणि परिसरात थंडी वाढली आहे.
rain
rainsakal

पुणे : शहर आणि परिसरात पहाटेपासून धुक्यांची चादर, ढगाळ हवामान आणि दुपारनंतर जोरदार पावसाला सुरवात झाली. सध्या ईशान्य अरबी समुद्राच्या दक्षिण गुजरात-उत्तर कोकण किनार पट्टीलगत चक्रीय स्थितीमुळे पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे.

नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून शहर आणि परिसरात थंडी वाढली आहे. त्यात बुधवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने आतापर्यंत डिसेंबर महिन्यातील पावसाचा विक्रम मोडला. गुरवारी (ता. २) सकाळपर्यंतच्या २४ तासांत तब्बल ७५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यात गेल्या दोन दिवसांपासून सध्या शहरातील कमाल तापमान हे सरासरीपेक्षा १० अंश सेल्सिअस पेक्षा कमी नोंदले जात आहे.

परिणामी शहरात ढगाळ वातावरणासह पाऊस, दाट धुके आणि थंडी असे वातावरण तयार झाले आहे. तर आज पहाटेपासूनच विविध भागात दाट धुक्यामुळे दिवसाची दृष्यमानता ही कमी झाली होती. ढगाळ हवामान कायम असून दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरींना सुरवात झाली आहे. त्यामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली असून सध्या पुणेकर थंडी आणि पाऊस असा संमिश्र वातावरणाचा अनुभव घेत आहेत. तर दुपारी तीन वाजेपर्यंत शहरात १८.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हवामानाच्या अंदाजासाठी उपग्रहाच्या छायाचित्रांतून असे दिसून आले आहे की पुणेच्या मध्य भागात, सातारा घाट आणि महाबळेश्‍वर परिसरावर ढग साचले आहेत. त्यामुळे पुढील दोन तास शहर आणि परिसरात पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता आहे.

rain
गुजरातने महाराष्ट्राला टाकलं मागे, उद्योगांसाठी सर्वाधिक पसंती!

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ ः

बंगालच्या उपसागरात जवाद चक्रीवादळाची निर्मिती झाले आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ‘जवाद’ या चक्रीवादाळी निर्मिती झाली असून ही प्रणाली शनिवारपर्यंत (ता. ४) उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. सध्या अरबी समुद्र आणि बंगालचे उपसागर या दोन्ही भागातून बाष्पयुक्त वारे राज्यात प्रवेश करत असून यामुळे पाऊस पडत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

दोन वाजून ५० मिनिटांपर्यंत झालेली पावसाची नोंद (मिलिमीटरमध्ये) ः

शिवाजीनगर ः ०.५

चिंचवड ः १.५

लवळे ः ०.५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com