Video:पुणे लॉकाडाउन ते लॉकडाउन व्हाया अनलॉक

योगीराज प्रभुणे
सोमवार, 13 जुलै 2020

राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात 9 मार्चला आढळला. त्यानंतर शहरात हँड सानिटायझर, मास्क आणि हँड ग्लोअज याची प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. कोरोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी सोशल डिस्टसिंग वाढलं. याच दरम्यान संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा झाली. पुणंही जागच्या जागी थांबलं.

पुणे : पुण्यानं मार्चपासूनचं लॉकडाऊन अनुभवलं. जूनमध्ये अनलॉकच्या पहिल्या टप्प्यातच रस्त्या-रस्त्यावर झालेली गर्दी पाहिली आणि आता पुन्हा लॉकडाऊनकडे प्रवास सुरू केला आहे. या दरम्यान 39 हजार पुणेकरांना संसर्ग झाला. संसर्ग झालेल्या प्रत्येक शंभरपैकी 64 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात 9 मार्चला आढळला. त्यानंतर शहरात हँड सानिटायझर, मास्क आणि हँड ग्लोअज याची प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी वाढली. कोरोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी सोशल डिस्टसिंग वाढलं. याच दरम्यान संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा झाली. पुणंही जागच्या जागी थांबलं. गर्दीने ओसंडून वाहणारे शहरातील प्रमुख रस्ते निर्मनुष्य झाले. खासगी आणि सार्वजनिक वाहतूक बंद झाली. या दरम्यान म्हणजे मार्चअखेरपर्यंत कोरोनाची संख्या 48 झाली होती. तीच संख्या एप्रिलमध्ये 1200 झाली. मेमध्ये कोरोनाबाधीत रुग्णांची जवळपास साडेपाच पटीने वाढ झाली. रुग्णसंख्येने सहा हजारांचा टप्पा ओलांडला. गुणाकार पद्धतीने रुग्णसंख्या वाढीचा वेगा जूनमध्येही कायम होता. जूनमध्ये 14 हजार 408 पर्यंत कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद महापालिकेत झाली. याच कालावधीत आपण अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. मोठ्या संख्येने पुणेकर घराबाहेर पडले. सोशल डिस्टसिंगची तीन-तेरा वाजले होते. रस्तांवर चौका-चौकात वाहनांची कोंडी होत होती. यामुळे रुग्णसंख्या वाढीचा वेग वाढलाच, पण शहरात कोरोना निदानाच्या चाचण्याही या काळात वाढविण्यात आल्या. त्याचा थेट परिणाम रुग्णांची संख्या वाढण्यात झाला. संपूर्ण जूनमध्ये 14 हजार 408 असलेली रुग्णांची संख्या आता 1 ते 12 जुलै या दरम्यान 16 हजारांवर गेली आहे. हा वाढीचा वेग नियंत्रित करण्यासाठी पुण्यात मंगळवारी पहाटे (ता. 13) 1 वाजल्यापासून पुण्यात लॉकडाऊन सुरू करण्यात येत आहे.

आणखी वाचा - पुणे जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये लॉकडाउनची कडक अंमलबजावणी

यात चांगली गोष्ट आवर्जून सांगितले पाहिजे ती म्हणजे कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण पूर्णपणे बरा होण्याचे प्रमाण 64 टक्के आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेतलीच पाहिजे. वेळोवेळी साबणाने व्यवस्थित स्वच्छ हात धुतले पाहिजे. हँड सॅनिटाझर वापरण्याची गरज आहे. तसेच, सोशल डिस्टसिंग, मास्क याचा वापरही प्रतिबंधासाठी करणे आवश्यक आहे. पण, त्यातूनही कोरोनाचा संसर्ग झालाच तर घाबरून न जाता वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे उपचार करावे. कोरोना संसर्ग पूर्णपणे होतो, असा विश्वास वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune city district lockdown after unlock reasons impact