वीजपुरवठा खंडित; पुणेकरांचा खोळंबा

पांडुरंग सरोदे
गुरुवार, 5 एप्रिल 2018

पुणे : कामासाठी गुरुवारी सकाळी घराबाहेर पडलेले पुणेकर ऐनवेळी विजेअभावी सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत अडकले. रणरणत्या उन्हात वाहनचालकांचा भरपूर वेळ वाया गेला. वाहतूक कोंडीमुळे अनेकांना कामावर जाण्यासाठी अर्धा ते एक तास उशीर झाला.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणच्या चौकात उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यावर भर दिला. 

पुणे : कामासाठी गुरुवारी सकाळी घराबाहेर पडलेले पुणेकर ऐनवेळी विजेअभावी सिग्नल यंत्रणा बंद पडल्याने निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत अडकले. रणरणत्या उन्हात वाहनचालकांचा भरपूर वेळ वाया गेला. वाहतूक कोंडीमुळे अनेकांना कामावर जाण्यासाठी अर्धा ते एक तास उशीर झाला.

दरम्यान, वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणच्या चौकात उभे राहून वाहतूक सुरळीत करण्यावर भर दिला. 

महावितरणकडून गुरुवारी सकाळपासून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे शहरातील बहुतांश ठिकाणची सिग्नल यंत्रणा अक्षरशः कोलमडली. शहरातील प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्त्यांसह ठिकठिकाणच्या चौकांमध्ये गुरुवारी सकाळी दहानंतर वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्याचे दिसून आले. विशेषतः शहराच्या मध्यवर्ती व उपनगरांमधील प्रमुख रस्त्यांसह अंतर्गत भागातील रस्ते व चौकांमधील गर्दीत वाढ होत गेली.

काही वाहनचालक भर गर्दीत गाडी पटकन काढण्याचा प्रयत्न करीत असल्याने वाहनचालकांमध्ये बाचाबाची व वादाचे प्रकारही घडले. 

दरम्यान, यामुळे वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली. वाहतूक शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे प्रमुख रस्ते व चौकांमध्ये वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, छोट्या रस्त्यांवरील चौकांमधील बंद सिग्नलमुळे तेथे बराच वेळ वाहतूक कोंडी होती. दरम्यान, दुपारनंतर वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर सिग्नल यंत्रणा कार्यान्वित झाली. 

नेहमीपेक्षा या गुरुवारी वीजपुरवठा जास्त वेळ खंडित झाल्याने सिग्नल बंद राहिले. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. मात्र, पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. वाहतूक शाखेकडील काही मनुष्यबळ पोलिस भरतीमध्ये गुंतल्याने उपलब्ध पोलिसांना अधिक काम करावे लागले. 
- प्रभाकर ढमाले, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा 

वीज गेल्याने सिग्नल यंत्रणा बंद होती. शनिवारवाड्यावरून स्वारगेटच्या दिशेने येत असताना आम्ही वाहतूक कोंडीमध्ये अडकलो. त्यामध्ये आमची 20 मिनिटे वाहतूक कोंडीमध्येच गेली. विजेवर कायम अवलंबून न राहता सिग्नल यंत्रणा इन्व्हर्टर किंवा सौर ऊर्जेवर सुरू ठेवली पाहिजे.
- मयूरेश कुलकर्णी, विद्यार्थी

Web Title: Pune city faces traffic jam as load shedding puts all the signals off