Pune : आधी भाडे माफी; आता कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal
पुणे : आधी भाडे माफी; आता कारवाई

पुणे : आधी भाडे माफी; आता कारवाई

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे - शहरातील २० हजार पथारी व्यावसायिकांचे कोरोना काळातील भाडे व दंड माफ केल्यानंतर आता अतिक्रमण विभागाने कारवाईसाठी दंडुका उचलण्याची निश्चित केले आहे. १५ कार्यालयाच्या हद्दीत सहाय्यक आयुक्तांच्या उपस्थितीत पूर्वसूचना न देता अचानक कारवाई केली जाणार आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षापासून बंद असलेले पथारी व्यावसायिक पुन्हा व्यवसायासाठी सरसावले आहेत. दिवाळीच्या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने पथारी व्यावसायिकांचा व्यवसाय देखील चांगल्या पद्धतीने झाले आहे. या काळात महापालिकेने कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेकांना व्यवसाय करण्याची संधी मिळाली. मात्र, आता दिवाळी झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने पुन्हा अतिक्रमणांकडे मोर्चा वळवला आहे.

महापालिकेच्या स्थायी समितीने कोरोना काळात पथारी व्यवसाय बंद असल्याने या काळातील व्यवसायिकांचे थकलेले भाडे आणि त्यावरील दंड अशी बारा कोटी रुपयांची रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला. त्याचा फायदा शहरातील २० हजार व्यावसायिकांना झालेला आहे. मात्र पुढील काळात पथारी व्यावसायिकांना शिस्त लावण्यासाठी पंधरा क्षेत्रीय कार्यालयामध्ये सहाय्यक आयुक्तांच्या उपस्थितीत अचानक कारवाई करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी अतिक्रमण विभागाने नियोजन सुरू केले आहे.

हेही वाचा: बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीला सुरवात

अतिक्रमण विभागाचे प्रमुख माधव जगताप म्हणाले, "प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये आठवड्यातून एक दिवस मोठ्या प्रमाणात कारवाई केली जाणार आहे. या वेळी तेथील सहाय्यक आयुक्त उपस्थित राहतील तसेच कोणत्या भागात कारवाई होणार आहे याची पूर्व कल्पना दिली जाणार नाही. अचानक कारवाई करण्यावर भर दिला जाणार आहे. "

पथारी व्यवसाय पंचायतीचे सचिव बाळासाहेब मोरे म्हणाले, ‘‘जे अनधिकृतपणे व्यवसाय करणारे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यास काही हरकत नाही. मात्र यानिमित्ताने पुनर्वसनाचा प्रश्‍न पुन्हा एकदा समोर येत आहे. महापालिकेने अनेक व्यावसायिकांचे पुनर्वसन केलेले नाही, प्रमाणपत्र दिलेले आहे पण त्यांना रोज वेगळ्या ठिकाणी बसायला भाग पाडले जात आहे. महापालिकेने कडून अन्यायकारक कारवाई केल्यास त्या विरोधात आंदोलन केले जाईल.

कोणावर होणार कारवाई

- बेकायदा व्यवसाय करणारे स्टॉलधारक पथारीधारक

- ठरवून दिलेल्या जागे ऐवजी इतर ठिकाणी व्यवसाय करणारे

- निश्‍चीत केलेल्या जागेपेक्षा जास्त जागा व्यापणारे

- ज्या कारणासाठी परवानगी दिली आहे त्याऐवजी दुसरा व्यवसाय करणारे

- स्टॉल, पथारीची जागा भाड्याने देऊन इतरांकडून व्यवसाय करून घेणारे

loading image
go to top