esakal | Pune : बंद नंतर शहर पुन्हा पूर्वपदावर
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Shops
पुणे : बंद नंतर शहर पुन्हा पूर्वपदावर

पुणे : बंद नंतर शहर पुन्हा पूर्वपदावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला सकाळी संमिश्र प्रतिसाद मिळाला, पण दुपारनंतर शहरातील बंद संपल्याने ठप्प झालेले जनजीवन पुन्हा पूर्वपदावर आले. बाजारपेठ खुली झाली, नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा मिश्रा यांच्या ताफ्यातील कारने शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना उत्तरप्रदेश मधील लखीमपूर येथे घडली. याविरोधात आज महाराष्ट्र बंदचे आवाहन राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीने केले होते. पुण्यात देखील या बंदसाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिन्ही पक्षांसह समविचारी संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या.शहरातील व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनाही या बंद मध्ये सहभागी करून घेतल्याने मार्केटयार्ड, बाजारपेठेसह इतर भागातील दुकाने बंद राहिल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली. दुपारी तीन नंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याने ठप्प झालेले पुणे पुन्हा पूर्वपदावर आले.

हेही वाचा: नवी नवरी दोनच दिवसात दागीने, कपडे व रोकड़ घेवून पळाली

सकाळपासून पीएमपी सेवा बंद व रिक्षाही बंद असल्याने कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या नागरिकांचे हाल झाले होते. त्यांना पर्यायी व्यवस्था करावी लागली. पण दुपारी बारानंतर रिक्षासेवा व दुपारी तीननंतर रस्त्यावर पीएमपी बस धावण्यास सुरवात झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. इतर वाहनांचीही रस्त्यावर गर्दी वाढली. सर्व प्रकारची दुकाने, हॉटेल, खाद्य पदार्थ्यांचे स्टॉल सुरू झाली होती. ग्राहकांनी देखील खरेदीसाठी गर्दी केली होती.

बंदच्या दरम्यान कोणताही गैरप्रकार किंवा त्यास हिंसक वळण लागू नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रमुख ठिकाणांवर, प्रत्येक पोलिस ठाण्याच्या अंतर्गत पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. पण शहरात शांततेत आंदोलन झाल्याने अनुचित प्रकार घडला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

loading image
go to top