पुणे पोलिसांकडून कारवाईचा बडगा सुरू; कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्या ४५० जणांवर कारवाई

Pune_Police_Lockdown
Pune_Police_Lockdown

पुणे : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे पुन्हा लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये संचार मनाई आदेश डावलणाऱ्या आणि मास्कचा वापर न करणाऱ्या तब्बल ४५० जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. तसेच नागरिकांनी संचार मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास नागरिकांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

पोलिसांकडून दिवसा आणि रात्री अशा दोन टप्प्यांत शहराच्या वेगवेगळ्या भागात नाकाबंदी केली जात आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. त्यानुसार, परवानगी न घेता संचार केल्याप्रकरणी २८८ जणांवर कारवाई केली आहेत, तर १८५ वाहने जप्त केली आहेत. मास्कचा वापर न करणाऱ्या ५८ जणांवर कारवाई केली आहे. शहरात सध्या नाकाबंदीच्या ठिकाणी २६१ पोलीस अधिकारी आणि १६२७ कर्मचारी तैनात आहेत.

"शहरात संचारबंदीचे आदेश लागू आहेत. याचा नागरिकांनी गांभीर्याने विचार करावा. नागरिकांनी आदेशाचे पालन करावे आणि विनाकारण घराबाहेर पडू नये."
- डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com