देशात रस्ते अपघातातील मृत्यू घटले; पुण्याचा सहावा क्रमांक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

पुणे : वाहतूक नियमांची जनजागृती, शिस्तीच्या पालनासह कारवाईचा बडगा उचलल्याने रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूची संख्या घटत आहे. देशात 2016 मध्ये एक लाख 35 हजार 656 जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. 2017 मध्ये ही संख्या घटून एक लाख 34 हजारावर आली. यामध्ये देशात राज्याचा तिसरा तर प्रमुख महानगरांमध्ये पुण्याचा सहावा क्रमांक आहे. 

'नॅशनल क्राईम रिपोर्ट ब्युरो'मध्ये 2017 मध्ये महाराष्ट्रात 12 हजार 91 जणांचा, तर पुण्यात 435 जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे. पुण्यातील वाहनांची संख्या 30 लाखांच्या पुढे गेली आहे. भरधाव वाहन चालविल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे, तर अनेक जण कायमचे अधू होत आहेत. 

नो एंट्रीतून गाडी आणणे, हेल्मेट न घालणे, सिटबेल्ट न लावणे, ट्रिपलसिट दुचाकी चालविणे, सिग्नल तोडणे, मद्य पिऊन गाडी चालविल्यामुळे अपघात होऊन अनेकांचा बळी जात आहे. नियमांचे पालन करावे, यासाठी पुण्यात बेधडक कारवाई केली. तसेच नागरिकांचे प्रबोधनही केले जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. 

विशेष म्हणजे प्रमुख शहरांमध्ये अपघातांमध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होत आहे. 2017 मध्ये सर्वाधिक दिल्लीमध्ये एक हजार 317, तर सर्वांत कमी कोचीमध्ये 113 जणांचा अपघाती मृत्यू झाला. 2016 च्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे, तर उत्तर प्रदेश 15 हजार 941, तमिळनाडू 15 हजार 414, महाराष्ट्र 12 हजार 91, मध्य प्रदेश 11 हजार 140, तर कर्नाटकात 9 हजार 818 जणांचा मृत्यू झाला आहे. 

प्रमुख महानगरांमध्ये रस्ते अपघातातील मृत्यू 
शहर 2017 2016 
दिल्ली 1317 1429 
चेन्नई 1312 1212 
जयपूर 647 808 
बंगळूर 629 794 
मुंबई 492 465 
पुणे 435 470 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune city Rank 6th for decreasing Death toll in road accident