पुणे : ...म्हणून ट्राफिक पोलिसालाच बसला ५ हजार रुपये दंड!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 August 2020

पोलिसांची प्रतिमा मलिन करणारे वर्तन केल्याप्रकरणी दौंडकर यांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

पुणे : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आरटीओमध्ये जाऊन दंड भरावा लागेल, अशी भीती दाखवत वाहनचालकाकडून अडीच हजार रुपये उकळणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसाला पाच हजार रुपये दंड करण्यात आला आहे. 

हॉटेल-मॉल सुरू झाल्यानंतर शहरात कसं होतं वातावरण? वाचा सविस्तर​

सहायक पोलिस फौजदार प्रकाश बाबुराव दौंडकर असे दंड झालेल्या पोलिसांचे नाव आहे. वाहतूक शाखेचे उपायुक्त प्रसाद अक्कानवरु यांनी दौंडकर यांना ही शिक्षा सुनावली.
दौंडकर हे विमानतळ वाहतूक विभागात वाहनांवर कारवाई करणाऱ्या टेम्पोवर ऑपरेटर म्हणून कर्तव्यावर होते. सहा फेब्रुवारी रोजी त्यांनी एकाचे वाहन टो केले होते. वाहनचालक गाडी सोडविण्यासाठी दौंडकर यांच्याकडे गेला. तेव्हा त्यांनी वाहन जप्त करण्याची आणि आरटीओकडे जाऊन दंड भरावा लागेल, अशी भीती गाडी मालकाला दाखविली.

पेटीएम अपडेट करून देतो म्हणाला अन् दोघींना २ लाखांना चुना लावला​

त्यानंतर टेम्पोचालक संजय बनसोडे आणि हेल्पर धर्मा यांच्याकडे निर्देश करून त्यांच्यामार्फत पैशांची मागणी केली. त्यावेळी गाडीमालकाकडून अडीच हजार रुपये घेतले होते. याबाबत दाखल तक्रारीची उपायुक्त अक्कानुवरु यांनी चौकशी केली. त्यात दौंडकर यांनी पैसे घेतल्याचे आढळून आले. पोलिसांची प्रतिमा मलिन करणारे वर्तन केल्याप्रकरणी दौंडकर यांना पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune City Traffic Police has been fined Rs 5000