Water Supply Close : पुणे शहरातील दक्षिण भाग वगळता इतर सर्व भागात गुरुवारी पाणी बंद

पुणे महापालिकेने पाणी पुरवठ्यातील विस्कळितपणा कमी करण्यासाठी वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या फक्त दक्षिण पुण्यातील पाणी बंदचे स्वतंत्र नियोजन केले आहे.
Water supply closed
Water supply closedsakal

पुणे - महापालिकेने पाणी पुरवठ्यातील विस्कळितपणा कमी करण्यासाठी वडगाव जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या फक्त दक्षिण पुण्यातील पाणी बंदचे स्वतंत्र नियोजन केले आहे. त्यामुळे उर्वरित संपूर्ण शहरासह मध्यवर्ती पेठांमध्ये दर गुरुवारी पाणी बंद असणार आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने पाण्याचा वापर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दर गुरुवारी पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याची १८ मे पासून अंमलबजावणी सुरू केली आहे. पण त्यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी समोर आल्या. नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी महापालिकेने वडगाव बुद्रूक जलशुद्धीकरण केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या वडगाव बुद्रूक, धनकवडी, आंबेगावपठार, आगम मंदिर, बालाजीनगर, कात्रज, सुखसागरनगर, कोंढवा बुद्रूक, येवलेवाडी, अप्पर इंदिरानगर भागासाठी स्वतंत्रपणे नियोजन केले आहे. त्याबाबतच सविस्तर वृत्त मंगळवारी (ता. २३) प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Water supply closed
Pune Municipal Engineers : पुणे महापालिकेतील तीन अभियंत्यांवर बोगस अनुभवाचा ठपका

हा भाग वगळता शहराच्या इतर भागात यामध्ये संपूर्ण पेठा, कोथरूड, बाणेर, बालेवाडी, शिवाजीनगर, येरवडा, डेक्कन जिमखाना, बोपोडी, लष्कर, हडपसर, दत्तवाडी, संपूर्ण नगर रस्ता, पुणे स्टेशन परिसर, बंडगार्डन, मुंढवा यासह शहराच्या इतर भागात दर गुरुवारी पाणी बंद असणार आहे, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com