शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पुणे - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत विविध जलकेंद्रांत देखभाल आणि दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याने गुरुवारी (ता. ३०) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेने कळविले आहे. पर्वती, वडगाव, चतु:श्रुंगी, एसएनडीटी, वारजे, लष्कर जलकेंद्र व नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. या केंद्रांमध्ये विद्युत, स्थापत्यविषयक अत्यावश्‍यक दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाईल.

Web Title: Pune city water supply off On Thursday